esakal | मुलीच्या जीवासाठी पाचव्यांदा पायपीट, पण मंजूर झाल्यावरही मिळालं नाही म्युकरमायकोसिसचं इंजेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

injection

मुलीच्या जीवासाठी तब्बल पाचव्यांदा पायपीट, पण मंजूर झाल्यावरही मिळालं नाही इंजेक्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनावर (coronavirus) मात केलेल्या एका मुलीला म्युकरमायकोसिस (mucor micosys) या बुरशीजन्य आजाराने ग्रासले. या आजारावरील अँटी-फंगल इंजेक्शन ‘अम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा (shortage of amphoteresin b injection) असल्याने या मुलीच्या वडिलाने जिल्हाधिकारी कार्यालयात (nagpur collector office) खेटा घालून पाच इंजेक्शन मंजूर केले. जिल्हा प्रशासनाने शासकीय दंत रुग्णालय व महाविद्यालायतून (nagpur government dental college and hospital) इंजेक्शन घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र वडिलांना दिले. मागील चार दिवसांपासून ते इंजेक्शनसाठी खेटा घालत आहेत. मात्र, दंत प्रशासनाने त्यांना इंजेक्शन न देता, दोन दिवसांपूर्वी यायला हवे होते, असे सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला. हे इंजेक्शन दुसऱ्या कुणाला लावले की काळाबाजार विकले, असा प्रश्न उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या त्या मुलीच्या वडिलांनी केला आहे. (man not get amphoteresin b injection even after collector office permission in nagpur)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

लेकीचा जीव वाचवण्यासाठी शासकीय दंत रुग्णालयात तसेच मेडिकलमध्ये इंजेक्शनसाठी खेटा घालणाऱ्या त्या वडिलांचे नाव डॉ. माहेश्वरी. त्यांची मुलगी सृष्टी रामदासपेठेतील अर्नेजा हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. उपचार करणाऱ्यांना डॉक्टरांनी ‘अम्फोटेरिसिन-बी’ची सोय करा असे सांगितल्यानंतर डॉ. माहेश्वरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या इंजेक्शनची मागणी केली. वारंवार जाऊन पाच इंजेक्शन मंजूर केले. तसा आदेश डॉ. माहेश्वरी यांना व्हॉट्सअ‌ॅपवर आला. हे पत्र घेऊन डॉ. माहेश्वरी शासकीय दंत रुग्णालय व महाविद्यालय येथे चार दिवसांपासून ‘अम्फोटेरिसिन-बी’ची मागणी करण्यासाठी जात आहेत. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांना भेटल्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी यायचे होते, असे सांगितले. अशाप्रकारे मागील चार दिवसांपासून ‘अम्फोटेरिसिन-बी’चा डोस मुलीला मिळाला नाही. यामुळे अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत दंतचे अधिष्ठाता डॉ. फडनाईक यांच्याशी संपर्क साधला, परंतु होऊ शकला नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयातून ‘अम्फोटेरिसिन-बी’ इंजेक्शनचे पाच डोस मिळाले. शासकीय दंत रुग्णालयातून हे डोस घ्यावे, असे पत्र व्हॉट्स अ‌ॅपवर मिळाले. त्यानुसार दंत रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिले नाही. चार वेळा खेटा घातल्या. येथील डॉक्टरांनी आपल्या संबंधितांना लावले असतील. त्यांनीच काळाबाजार केला असावा.
-डॉ. माहेश्वरी, अर्नेजा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीचे वडील