चितळाची शिकार करणे पडले महागात; चार जणांना घेतले ताब्यात, वनविभागाची कारवाई

deer
deer

टाकळघाट (जि. नागपूर) :  होळीचा पाडवा साजरा करण्यासाठी वन्यप्राणी चितळाची शिकार करणे चौघांना महागात पडले. त्यांना वनविभागाच्या कारवाईसाठी सामोरे जावे लागले.

ही घटना २८ मार्चच्या रात्री साडे अकराच्या सुमारास चारगाव उपवनक्षेत्रातील सुराबर्डी बिट परिसरात घडली असून फतरु विठोबा धोंडे(रा.चारगाव), सुधाकर गणबा डोंगरे, भोजू देवराव डोंगरे, दिलीप ताईस्कर (सर्व राहणार रिधोरा) यांना ताब्यात घेण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की होळी सणानिमित्त बुटीबोरी वनपरिक्षेत्र क्षेत्रात ग्रस्तीकरिता पथक तयार करण्यात आले होते. पथक ग्रस्ती करतेवेळी चारगाव उपवन क्षेत्रात सुराबर्डी शिवारात वन्यप्राण्याची शिकार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. वनकर्मचाऱ्यांचे तीन पथक तयार करून वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही.ठोकळ यांच्या मार्गदर्शनात रवाना झाले. 

सकाळी पाचच्या सुमारास चार व्यक्ती चितळाचे मास कापताना दिसून आल्या. त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून वन्यप्राणी चितळ मृतावस्थेत( अंदाजे ७० किलो ), सत्तूर, कुऱ्हाड, मोबाईल, मोटरसायकल आदी साहित्य जप्त करून आरोपीस उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले.

ही कारवाई उपवनसंरक्षक शुक्ला, सहायक वनसंरक्षक चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही.ठोकळ, क्षेत्र सहायक जाधव, मेश्राम, जनवार, धुर्वे, नागरगोजे, जाधव, कुलरकर, डोंगरे, शेंडे आदींनी केली.

संपादन -  अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com