बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका!

विद्यार्थी बुचकाळ्यात, बोर्डाला स्वतःच्या ‘फॉरमॅट’चा विसर
Mistakes in English question paper of12th maharashtra board
Mistakes in English question paper of12th maharashtra board sakal

नागपूर : राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, बोर्डाने ठरवून दिलेल्या प्रारूपाच्या(फॉरमॅट)विपरित पेपर आल्याने विद्यार्थी बुचकाळ्यात पडले.

गेल्यावर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी शिक्षण मंडळाने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरविले. शुक्रवारी इंग्रजीचा पहिल पेपर होता. मात्र, सकाळी सुमारास प्रश्नपत्रिका हाती पडल्यावर त्यात अनेक चुका असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यी बुचकाळ्यात पडले. बोर्डाने दिलेल्या सूचना व प्रश्नपत्रिका प्रशिक्षणानुसार व्याकरणाच्या प्रश्नांना पर्याय देण्यात आला नव्हता. मुलाखतीच्या प्रश्‍नासाठी टेबल आवश्यक असताना तो दिला नव्हता. ‘सिम्पल सेंटेन्स’ ‘सिम्पल’ करण्यासाठी दिले होते. अपील लिहिण्याच्या सूचना अपूर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांना समजू शकल्या नाहीत.यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या पॅटर्ननुसार पेपर पुन्हा घेण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

जुनाच पेपर केला कॅरी फारवर्ड

गेल्यावर्षी बारावीचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षी तयार करण्यात आलेली प्रश्‍नपत्रिका जशीच्या तशी देण्यात आली. विशेष म्हणजे, यावर्षी प्रश्‍नपेढी तयार करीत, ती एक मार्गदर्शिका म्हणून त्यातील प्रश्‍नांच्या आधारावर पेपर तयार करायचा होता. तशी घोषणाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. मात्र, त्याच्या विपरित प्रश्‍नपत्रिका देण्यात आली.

यामुळे उडाला गोंधळ

नागपूर, मुंबई, कोल्हापूर आणि लातूर या चार बोर्डातून १२ पेपर छाननी साठी आले होते. त्यापैकी एक पेपर घेणे आवश्‍यक होते. या पेपरमधील छाननी समितीने त्यातून चूका दुरुस्त करुन ते पेपर बोर्डाकडे सादर केल्याचे सांगण्यात आले. त्यातला एक पेपर बोर्डाने घेणे अपेक्षित होते. पण सदोष पेपर सादर केल्याने आज गोंधळ उडाला. विशेष म्हणजे समितीत जुने आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश असतो. त्यांना नव्या अभ्यासक्रमांचा गंध नसल्याने हा बोजवारा उडाल्याचे दिसत असल्याचे एका तज्ज्ञाने सांगितले.

अशा आहेत चुका

  • प्रश्‍न १ मधील ए -५ मध्ये दोन सेन्टेन्स सिम्पल करायचे होते. त्यात पहिला प्रश्‍न सिम्पल देऊन तो सिम्पल करा असे सांगितले.

  • प्रश्‍न क्रमांक २ सीमध्ये ‘माईंड मॅपींग’ आणि प्रश्‍न क्रमांक ४ ‘सी’ ‘एक्स्पान्शन ऑफ आयडिया’ या दोन्ही प्रश्‍नांचा विषय एकच असल्याचे दिसून आले.

  • प्रश्‍न क्रमांक ३ मधील कवितेवर आधारीत प्रश्‍न आकलनापलीकडचा होता.

  • प्रश्‍न क्रमांक ४ मधील ‘डी’ यातील ‘अपील रायटींग’ हा प्रश्‍नच अपूर्ण होता.

  • प्रश्‍न क्रमांक ४ मधील `बी’ यामध्ये देण्यात आलेला ‘इंटरव्ह्यूमध्ये बोर्डाच्या निर्देशाप्रमाणे ‘टेबल फॉरमॅट’ नव्हता.

  • प्रश्‍न क्रमांक - ५ मध्ये नॉव्हेलमधील सर्व प्रश्‍न विद्यापीठस्तराचे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, त्याचा ठराविक भाग अभ्यासक्रमात दिला असताना, प्रश्‍न मात्र, संपूर्ण नॉव्हेलवर विचारण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com