राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते संतापले; म्हणाले, आमदार कृष्णा खोपडे यांचे मानसिक संतुलन बिघडले

MLA Krishna Khopade's mental balance deteriorated
MLA Krishna Khopade's mental balance deteriorated

नागपूर : उठसूठ कोणावरही टीका करणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे. परवाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर शहरातील हॉटस्पॉट परिसरांचा आढावा घेतला. यासाठी ते स्वतः रस्त्यांवर उतरले होते. त्यावर आमदार खोपडे यांनी "देशमुखांची नौटंकी' असल्याची टीका केली होती. त्याला कुंटे पाटलांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

भाजपची सत्ता गेली तेव्हापासूनच खोपडे यांचे संतुलन बिघडल्याचे दिसून येते. जणू काही आपल्याला सर्वांवरच टीका करण्याचा अधिकार लाभला असल्याच्या आर्विभावत ते वागत आहेत. रोज पत्रके काढून ते कोणावरी टीका करीत सुटले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या दौऱ्याला त्यांनी नौटंकी असे संबोधले. पण, हे करताना खोपडे कदाचित विसरले की, अशा परीस्थितीत रस्त्यावर उतरून काम करण्यालाही हिंमत लागते, असे प्रवीण कुंटे म्हणाले.

नागपूरच्या रस्त्यांवरून फिरणे सुरक्षित नाही. जिवाचा धोका पत्करूनच हे करावे लागते. गृहमंत्री घरात बसून व्हिडिओ कॉन्फरन्सवरही काम करू शकतात. परंतु, त्यांनी स्वतः जिल्ह्या-जिल्ह्यांच्या मुख्यालयी बैठका घेऊन आढावा घेतला आणि सुरक्षिततेसंबंधी प्रशासनाला आवश्‍यक सूचना दिल्या. नागपूर शहरही त्यांनी पिंजून काढले, असेही ते म्हणाले.

उगाच अकलेचे तारे तोडू नका

सत्ता गेली तेव्हापासून भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. देश कोरोनाशी युद्ध करीत असताना. भाजपवाले पुन्हा सत्ता मिळावी, यासाठी रोज राज्यपालांचे उंबरठे झिजवित आहेत. हे परिपक्व राजकारण्याची लक्षण नाही. त्यांच्या मतदार संघातील लोक अडचणीत असताना स्वतःला घरात कोंडून घेणारे व आमदारांचा मदत निधी राज्य सरकारकडे न देता "पीएम केयर'ला देणारे भाजप आमदार कृष्णा खोपडे व आपल्या मतदारसंघात ढुंकूनही न बघणारे माजी मुख्यमंत्री यांनी उगाच अकलेचे तारे तोडू नये, असा सल्लाही कुंटे पाटलांनी त्यांना दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com