नागपूर : आमदाराने भाजप सदस्यांना घेतले फैलावर

सक्रिय नसल्याने केली कानउघाडणी : माजी सदस्याकडे जबाबदारी
MLA took BJP members on spread not being active
MLA took BJP members on spread not being activeSAKAL

नागपूर : भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात लक्ष घातले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांनी बैठक घेत चांगलेच फैलारव घेतले. त्यांचा रोख विरोधी पक्ष नेत्यासोबत काही सदस्यांवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी सदस्यांना सक्रिय होण्याचा सल्ला देत एका माजी सदस्यावर जबाबदारी दिली. त्यामुळे येत्या काळा सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी होणार असल्याचे दिसते.

जिल्हा परिषदे अनेक विषय असताना विरोधी पक्षाकडून ते उचलून धरण्यात येत नसल्याने नाही. मोजकेच सदस्य असले तरी त्यांच्यात गटबाजी आहे. शिवाय काहींची जबाबदार नेत्यांवर नाराजी असून ती बोलूनही दाखविण्यात येत आहे. प्रत्येक सदस्य आपल्याना विरोधी पक्षनेता समजून काम करीत आहे. शिवाय बैठकांमध्ये नागरिकांचे विषय सोडून कंत्राटदारांच्या बिलाबाबतच अधिकाऱ्यांना धारेवर धरतात.

MLA took BJP members on spread not being active
औरंगाबाद महापालिकेकडे थकला ७५ कोटींचा कर जिल्हाधिकाऱ्यांचं प्रशासकांना पत्र

तर पदाधिकाऱ्यांच्या कक्षात बसून आपली कामे करून घेतात. मात्र त्यातील काही सदस्यांचे कामे होत नसल्याने अनेकांनी जिल्हा परिषदमध्ये येणेही बंद केले आहे. याबाबतची कुजबुज वरिष्ठांच्या कानावर होती. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ग्रामीण भागात याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बुधवारी २ फेब्रुवारी रोजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत काही सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सूत्रांकडून समजले. शिवाय भाजपचे सदस्य असताना काँग्रेसचे काम करता काय?, असा सवाल करीत त्यांनी सदस्यांना फैलावर घेतले.

तक्रारींचा पाढा

कामापेक्षा तक्रारीच जास्त येत असल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षात शिस्त महत्वाची असल्याचा डोसही पाजला. विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांच्या अनुपस्थितीने तर्कवितर्क लावण्यात आले. तर माज गट नेते अनिल निधान यांच्याकडे जिल्हा परिषदेची जबाबदारी देण्यात आली. एकप्रकारे जिल्हा परिषदेवर बावनकुळे यांना वर्चस्व ठेवायचे असल्याची राजकीय वर्तुळात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com