esakal | आता परीक्षेत कॉपी करण्याचेही धडे? सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, तर विद्यापीठाचा दावा फोल
sakal

बोलून बातमी शोधा

Exam.jpg

आता परीक्षेत कॉपी करण्याचेही धडे? सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, तर विद्यापीठाचा दावा फोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTM nagpur university) सर्व परीक्षा ऑनलाइन (online exam) पद्धतीने घेण्यात येत आहेत. त्यामध्ये कुठल्याही गैरप्रकार होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून संपूर्ण काळजी घेण्यात येत असल्याचा दावा करीत आहे. मात्र, यू-ट्यूब आणि सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांनी नेमकी कशी कॉपी करायची (cheating videos on socail media) याबाबत माहिती देणारे भरपूर व्हिडिओ असल्याचे पुढे आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार गंभीर असून याकडे विद्यापीठ प्रशासन आणि शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. (more video about cheating in online exam of university on social media)

हेही वाचा: तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. जीव महत्वाचा असल्याने पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेण्याऐवजी ऑनलाइनचा पर्याय समोर आला. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून देशभरात ऑनलाइन परीक्षा होत आहेत. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा अंतिम टप्प्यात तर २९ जूनपासून उन्हाळी परीक्षांना सुरुवात होत आहे. हिवाळी परीक्षांप्रमाणे उन्हाळीही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षांमध्ये होणाऱ्या प्रत्येक गैरप्रकाराची माहिती विद्यापीठाच्या सिस्टिममध्ये असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. याशिवाय नव्या परीक्षांमध्ये त्याबाबतची संपूर्णतः फुलप्रुफ यंत्रणा असेल असेही सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत यू-ट्यूब आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेदरम्यान कशी कॉपी करावी याबाबतच्या व्हिडिओने भरलेला आहे. हे सर्व व्हिडिओ केवळ नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेबाबत नसून राज्यातील इतर विद्यापीठांच्या परीक्षेत कशी कॉपी करावी, याची माहिती देणारे आहेत.

असे आहे व्यवस्थापन -

नागपूर विद्यापीठाद्वारे ४० गुणांसाठी एक तासाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना घरी बसून ही परीक्षा द्यावी लागते. विद्यापीठाने यासाठी संकेतस्थळ (वेब-बेस्ड) तयार केले आहे. ज्यामध्ये कॉपी रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पोर्टलवर जाताना त्यांचे मोबाईल लोकेशन चालू करावे लागते. याद्वारे विद्यार्थी एका जागी बसले की नाही हे दिसून येते. याशिवाय लॉगिनसाठी विद्यार्थ्यांना फोन कॅमेरा आणि माईक चालू करावा लागतो. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचाली टिपल्या जातात. ज्या विद्यार्थ्याने परीक्षा दिली त्यांची संपूर्ण परीक्षा वेळ सर्व्हरमध्ये नोंदली गेली आहे. काही गोष्टींवर क्लिक करून प्रत्येक गोष्ट शोधली जाऊ शकते, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात जर कोणी अशा प्रकारे विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत असेल तर ते चुकीचे आहे. विद्यापीठ अशा व्यक्तींवर निश्‍चित कारवाई करेल. याशिवाय अशा अनियमिततेस सामोरे जाण्यासाठी एक योग्य धोरणही तयार केले जाईल.
- डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ