नागपूर : पहाटे फिराच; पण सावधगिरीही बाळगा

प्रदूषणयुक्त धुके धोकादायक; दमा, श्वसनविकार असणाऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी
Morning walk
Morning walk sakal

नागपूर : सर्व ऋतूंमध्ये हिवाळा आरोग्यदायी मानला जातो. या दिवसांत बऱ्याच नागरिकांची ‘मॉर्निंग वॉक’साठी धावाधाव सुरू असते. त्यात मध्यमवयीन तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक असते. पहाटे थंडी वाढली की, व्यायामापासून माणूस दुरावतो. थंड हवा आरोग्याला पोषक असली तरी ‘धुक्याचे''चे प्रमाण याच काळात वाढते. धुक्यातील प्रदूषण न दिसणारे असते. यामुळे धुके असेल तर साधवगिरी बाळगा. दमा तसेच श्वसनासंबंधी आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. थंडीच्या दिवसांत त्वचा सांभाळणे एक आव्हानच असते.

Morning walk
गंगापूर शहरातील चित्र : सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

नागपूर तसे हॉट. यामुळे नागपूरकरांसाठी थंडी पर्वणी असते. पहाटवारा सर्वांना हवाहवासा असतो. यामुळेच नागपूरच्या विस्तारलेल्या सिमेंट रस्त्यावर आरोग्याबाबत जागरूक झाल्याचे चित्र सकाळी दिसते. सारेच व्यायामासाठी रस्त्यावर धावताना, चालताना दिसतात. पहाटेचे कोवळे ऊन-वारा अंगावर घेण्यासाठी धावपळ सुरू असते. थंडीचा ऋतू आरोग्याला पोषक असला तरी धोक्‍याची पातळी ओलांडलेले प्रदूषणयुक्त धुके धोकादायक आहे. थंडीत दमा, ब्रॉन्कॉयटीस आणि एकूणच श्वसनासंबंधी आजार वाढतात. योग्य काळजी घेतली नाही, तर दमाग्रस्तांना हृदयविकाराचा, फुप्फुसाचा अटॅक येऊ शकतो. योग्य प्रमाणात ऑक्‍सिजन न मिळाल्याने फुप्फुसांवर आघात होतो. सर्दी, ताप, खोकला, कफ यांचाही त्रास धुक्यांमुळे वाढतो, असे मेडिकल-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे श्वसनरोग विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले.

Morning walk
सर्दी, ताप, खोकला रुग्णांच्या संख्येत वाढ

नागपुरात तसे धुके जास्त दिसत नाही. मात्र पारा खाली आला की, व्हायरल इन्फेक्‍शनचा धोका वाढतो. सध्या सर्दी, खोकला, ताप तसेच श्वसन विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण मेडिकल-सुपर स्पेशालिटच्या श्वसनविकाररोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी नोंदवले. थंड वातावरणामुळे रोग प्रतिकारकशक्‍ती वाढते. त्यामुळे फिटनेससाठी हा काळ उत्तम आहे. मात्र, थंडीत श्‍वासनलिका आकुंचन पावत असल्याने श्‍वसनाचे विकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

Morning walk
नागपूर : क्रिप्टो करन्सीच्या नावावर साडेचार कोटींचा गंडा

नागपुरातही पहाटे धुराचा पट्टा

विविध प्रकारचे घातक वायू, धूळ आणि ओलेपणा यांच्यामुळे निर्माण होणारे प्रदूषणयुक्‍त वातावरण म्हणजे धुके. थंडीमध्ये वारे कमी गतीने वाहतात. त्यामुळे धूर आणि धूळ यांचा निचरा लवकर होत नसल्याने धुक्याचा धोका वाढतो. दिल्ली, मुंबईच्या धर्तीवर प्रदूषण नागपुरातही धोक्‍याची पातळी गाठू शकते, असे संकेत आहेत. शहरात अनेक ठिकाणी बांधकामे वर्षभर सुरूच असल्याने धूळ असतेच साहजिकच ‘धुक्यांचा धोका’चा धोका वाढला. पहाटे किंवा सायंकाळी उंचावरून शहराच्या सीमेकडे नजर टाकल्यास जमिनीपासून कमी अंतरावरच धुराचा पट्टा दिसतो.

ही घ्या काळजी

  •  डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी गॉगल वापरा

  •  नाक आणि तोंडावर रुमाल बांधा

  •  त्वचेची विशेष काळजी घ्या

  •  इतर आजार असणाऱ्यांनी पहाटे बाहेर पडू नये

  •  अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा

  •  दुचाकीवरून बाहेर पडताना वाऱ्यापासून बचाव करा

  •  चेहऱ्याला व डोक्‍याला रुमाल बांधा

Morning walk
मंत्री आदित्‍य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

थंडी वाढली की, दमा, सीओपीडी तसेच श्वसन विकारालीत रुग्णांची श्वासनलिका व उपनलिका अरुंद होण्याचा भास वाढू शकतो. यामुळे हवेचा पुरवठा कमी होऊन प्राणवायू कमी पडतो. वैद्यकीय क्षेत्रात थंडी तसा हेल्दी सिझन. मात्र सध्या कोरोनाने जग विळख्यात घेतले. कोरोना फुप्फुसावर वार करतो. यामुळे एकप्रकारचा श्वसन विकार आहे. थंडीत कोरड्या हवेमुळे श्वास घेताना त्रास होतो. ऍलर्जिक ब्रॉंकायटीस असलेल्यांना थंडीचा त्रास अधिक वाढतो.

-डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनविकार रोगतज्ज्ञ तसेच विभागप्रमुख, मेडिकल-सुपर, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com