सोयरीकीच्या वादामध्ये दगडाने ठेचून खून

मालगणी शिवारातील घटनेमुळे परिसरात खळबळ
दगडाने ठेचून खून
दगडाने ठेचून खूनsakal

चिखली - तालुक्यातील मालगणी शिवारात दगडाने ठेचून खून करून टाकलेल्या एकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटना १३ एप्रिलच्या रात्री १० ते ११ वाजेदरम्यान घडली असून याप्रकरणी चिखली पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी फिर्यादी ज्योती विनोद इंगळे (वय ३५, रा. डोंगरशेवली, हल्ली मुक्काम सावरगाव डुकरे तालुका चिखली) हिने फिर्याद दिली की, तिचा पती विनोद पंढरी इंगळे (वय ५०, रा. डोंगरशेवली तालुका चिखली) यांच्या त्रासाला कंटाळून ती तिचे मामाकडे सावरगाव डुकरे येथे राहत होती. तिच्या मुलीचे लग्न आरोपी सावरगाव डुकरे येथीलच बुद्धभूषण साहेबराव डोंगरदिवे याच्या मध्यस्थीने झाल्यामुळे तिचा पती विनोद पंढरी इंगळे हा मुलीच्या लग्नाची मध्यस्थी व सोयरीक का केली म्हणून सावरगाव डुकरे येथे बुद्धभूषण साहेबराव डोंगरे याचेशी वाद झाले.

यावेळी आरोपी बुद्धभूषण डोंगरदिवे याने तिच्या पतीला मारहाण करून दगडाने ठेचून जिवानिशी ठार केले असल्याची फिर्याद दिल्यावरून चिखली पोलिसांनी कारवाई करीत आरोपी बुद्धभूषण डोंगरदिवे यास ताब्यात घेत कारवाई केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्रीराम व्यवहारे, धनंजय इंगळे व कर्मचारी करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com