‘तू बैलबुद्धी का म्हटले, तो एमबीए झाला आहे’ असे म्हणत केला खून

A FIR of murder has been registered in Newase taluka
A FIR of murder has been registered in Newase taluka

नागपूर : दारू पार्टी करताना एमबीए शिकलेल्या तरुणाला बैलबुद्धी म्हटल्यावरून रागाच्या भरात दोघांनी मित्राचा खून केला. ही घटना मंगळवारी रात्री नंदनवनमध्ये घडली. तुषार ऊर्फ ठाकूर सुदेशसिंह बैस (२३, रा. व्यंकटेशनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाश ताराचंद गौड (२५, रा. श्रीनगर, नंदनवन) याला पोलिसांनी अटक केली तर अरुण ऊर्फ राम अवस्थी (२२, रा. व्यंकटेशनगर) हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश गौड, अरुण अवस्थी आणि तुषार बैस हे तिघेही मित्र आहेत. तुषार हा मनीषनगरातील बीग बाजारामध्ये नोकरी करतो तर अरुणचे एमबीए झाले असून आयटीसी कंपनीत नोकरी करतो. आकाश हा कामठी रोडवरील टाइल्सच्या दुकानात काम करतो. मंगळवारी तिघेही दारू पार्टी करण्यासाठी जागेचा शोध घेत होते.

A FIR of murder has been registered in Newase taluka
मैत्रीपूर्ण संबंधात पती ठरायचा अडसर; मित्राच्या मदतीने केला ‘गेम’

अरुणने व्यंकटेशनगरात फ्लॅटमध्ये एकटी राहत असलेल्या मैत्रिणीला फोन केला. तिच्या घरात पार्टी करायचे ठरविले. तिघेही दारू आणि चकणा घेऊन तिच्या फ्लॅटवर गेले. तेथे तिघांनीही दारू ढोसली. आकाशने मोबाईलवर गाणे वाजवले. त्यामुळे चिडून अरुणने गाणे बंद करण्यास सांगितले. त्यावर आकाशने अरुणला बैलबुद्धी म्हटले. त्यावरून तिघांत वाद-विवाद झाला. त्यानंतर अरुण दारूचा ग्लास घेऊन फ्लॅटमधून निघून गेला.

रस्त्यावर आणून केला खून

तुषार आणि अरुण हे दोघे पहाटे चार वाजता आकाशच्या घरी गेले. ‘तू अरुणला बैलबुद्धी का म्हटले. तो एमबीए झाला आहे’ असा जाब विचारला. त्यानंतर तिघेही नंदनवन स्ट्रिट हाउस रेस्टॉरंटजवळ आले. तेथे तुषारने अरुणचा अपमान केल्यामुळे मैत्री संपली, असे म्हटले. त्यामुळे चिडून आकाशने तुषारच्या छातीवर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले.

A FIR of murder has been registered in Newase taluka
‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

पश्‍चाताप झाला

तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दोघेही घाबरले आणि पळून गेले. तासाभरात ते पुन्हा घटनास्थळावर आले. त्यांना पश्‍चाताप झाला. अरुण आणि आकाशने जखमी तुषारला मेडिकलमध्ये नेले. त्याला दाखल करून उपचार सुरू केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे तुषारचा सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आकाशला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com