नागपूर : ड्रग्स तस्करीच्या पैशातून गुन्हेगाराचा खून

पाचपावलीतील थरार; तीन आरोपींना लाखनीतून अटक
नागपूर : ड्रग्स तस्करीच्या पैशातून गुन्हेगाराचा खून
नागपूर : ड्रग्स तस्करीच्या पैशातून गुन्हेगाराचा खूनsakal

नागपूर : ड्रग्स तस्करीच्या पैशाच्या वाटाघाटीवरून चौघांनी धारदार चाकूने भोसकून मित्राचाच खून केला. ही थरारक घटना पाचपावलीतील नवा नकाशा भागात घडली. भोजेश ऊर्फ गोल्डी शंभरकर (२४) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडातील चारपैकी तीन आरोपींना गुन्हे शाखेने लाखनीतून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डी प्रवीण शंभरकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर २०१८ पासून गुन्हे दाखल आहेत. खून करण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यावर लुटमार करणे, शस्राचा धाक दाखवणे आणि अवैध शस्त्र बाळगने असे गुन्हे गोल्डीवर दाखल आहेत. हत्याकांडाच सूत्रधार जहॉंगीर खान याच्याशी गोल्डीची मैत्री होती.

नागपूर : ड्रग्स तस्करीच्या पैशातून गुन्हेगाराचा खून
सोमय्या इफेक्ट? मुश्रीफांच्या जावयाकडील 1500 कोटींचं कंत्राट रद्द

अनेक गुन्ह्यात दोघेही सहभागी आहेत. गुन्हेगारी कृत्य करताना शारीक खान, मोहम्मद फैयाज आणि नियाज शेख यांच्याशी गोल्डीची ओळख झाली. गेल्या २०१९ पासून गोल्डीसह पाचही जण गुन्हेगारीत सक्रिय आहेत. जहॉंगिर खान आणि गोल्डीने गांजा विक्री आणि तस्करी सुरू केली होती. त्यातून कमावलेल्या पैशातून दोघांनीही ड्रग्स विक्री करणे सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्स विक्रीतून आलेल्या ८० हजार रुपयांच्या नफ्यातील वाटा जहॉंगिरने गोल्डीला दिला नव्हता. त्यामुळे दोघांत काही दिवसांपासून वाद सुरू होता. गोल्डी पैशासाठी तगादा लावत होता तर जहॉंगिर हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता.

असा घडले हत्याकांड

आज गुरूवारी सकाळी आठ वाजता चारही आरोपी गोल्डीच्या घरी आले. तेथे चौघांचा वाद झाला. त्यानंतर पाचही जण नवा नकाशा परीसरात सोबत गेले. तेथे चौघांनी गोल्डीला घेरले आणि सपासप चाकूने वार करणे सुरू केले. पाच मिनिटातच गोल्डी रक्ताच्या थारोळ्यात पडला. मृत पावल्याची खात्री करून चारही आरोपींनी पळ काढला.

आरोपींना लाखनीतून अटक

जहॉगिर खान हा हत्याकांडाचा सूत्रधार आहे. त्याला गोल्डीने गेम करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे गोल्डीचा गेम करण्याचा प्लान जहॉंगिरने केला. प्लाननुसार गोल्डीचा खून करून आरोपी दुचाकीने भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात पळाले. गुन्हे शाखेचे पीआय प्रदिप रायन्नावार यांनी चारपैकी जहॉंगिर खान, फैयाज आणि नियाजला अटक केली तर शाकीर खान अद्याप फरार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com