एकतर्फी प्रेमामुळे केला युवकाचा खून; दगड, विटांनी केला खात्मा

एकतर्फी प्रेमामुळे केला युवकाचा खून; दगड, विटांनी केला खात्मा

नागपूर : मुलीवर असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे (One sided love for a girl) युवक मुलीच्या घरासमोरून नेहमी चकरा मारायचा. तसेच मुलीकडे बघून इशारे करायचा. हा प्रकार न खपल्यामुळे युवकाचा चौघांनी मुडदा पाडला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी चार आरोपींना अटक (Four accused arrested) केली. उमेश रमेश चिकाटे (३४), विवेक विजय सहारे (३०), अविनाश विजय सहारे (३३) आणि स्वप्निल उर्फ गोलू बाबूराव चिकाटे (२८) सर्व रा. लष्करीबाग अशी आरोपींची नावे आहेत. (Murder of a youth due to one sided love)

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास कपिल श्रीकांत बैन (१८) आणि त्याचा मित्र अब्दुल सलीम सत्तार (दोन्ही रा. नोगा फॅक्टरीजवळ, मोतीबाग) याच्यासह लष्करीबाग येथील शीतला माता मंदिराजवळ खर्रा खात बसला होता. सहारे यांच्या गल्लीत अल्पवयीन मुलगी असल्याने कपिल हा नेहमीच त्यांच्या घरासमोरून चकरा मारत होता. तिला इशारे करीत आपले प्रेम व्यक्त करीत होता. हा प्रकार लक्षात आल्यामुळे सहारे कपिलवर चिडून होता.

सहारे याने त्याला घरासमोरून चकरा मारण्यास मनाई केली होती. तरीही कपिल ऐकत नव्हता. त्यामुळे सहारे संतप्त झाला होता. घटनेच्या वेळी कपिल हा शीतला माता मंदिराजवळ बसला असताना सहारे याने त्याला येथे का बसला? अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन चारही आरोपींनी दगड विटांनी कपिलच्या डोक्यावर मारून घटनास्थळीच ठार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले.

एकतर्फी प्रेमामुळे केला युवकाचा खून; दगड, विटांनी केला खात्मा
भाजप-काँग्रेसचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप; ओबीसी समाजाची लिडरशिप धोक्यात

शनिवारी आरोपी हे मोमीनपुरा आणि शहरातील इतर ठिकाणी फिरत असताना पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. पाचपावलीचे पीआय संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विक्रांत कारकर पुढील तपास करीत आहेत.

(Murder of a youth due to one sided love)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com