Nagpur : दिवाळीत एसटीच्या १९५ अतिरिक्त बस

यंदा राज्यभरात १ हजार ४९४ जादा गाड्या
ST Bus News
ST Bus Newsesakal

नागपूर : दरवर्षी दिवाळी सणात शाळांसह कर्मचाऱ्यांना सुट्या असतात. त्यामुळे गावाला, नातेवाइकांकडे तसेच पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटीने) नागपूर विभागातून १९५ जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्यभरात १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ST Bus News
Nagpur : मोकाट कुत्र्यांना आवरा हो...!

दिवाळीच्या सुट्टीत अनेक कुटुंब मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही घरी जातात. बहुतांश प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात सलग आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षीप्रमाणे नियमित बसफेऱ्या बरोबरच राज्यात १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

ST Bus News
Nagpur Railway station : कुत्रे आणि प्रवासी एकाच प्रतीक्षालयात

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत नागपूर विभागातून १९५ बसेस सोडण्यात येणार आहेत. २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान या गाड्या धावणार आहेत. एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

ST Bus News
Nagpur : भाजपला मिळणार यश?

त्यामुळे दिवाळीत ज्येष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. जादा बस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना गर्दीतून थोडाफार दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com