Nagpur : घटस्फोटीत पत्नीवर साहिल सय्यदचा अत्याचार Nagpur abuses divorced wife case filed custody | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape news

Nagpur : घटस्फोटीत पत्नीवर साहिल सय्यदचा अत्याचार

नागपूर : कुख्यात ठकबाजी व खंडणीखोर असलेल्या साहिल सय्यदने घटस्फोट घेतलेल्या पत्नीवर अत्याचार करीत तिची संपत्ती हडपण्याच्या प्रयत्न केला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी त्याच्यासह भाऊ तौफिकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलने एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेत, तिच्याशी विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर तिला तो सातत्याने मारहाण करायचा. याशिवाय दररोज तिच्याशी भांडण करायचा. त्यातून त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला होता. मात्र, काही दिवसानंतर त्याने पुन्हा तिची भेटणे सुरू केले.

यादरम्यान त्याने जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केला. याशिवाय भावाच्या मदतीने मारहाण करून तिची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला. त्यातून महिलेने कोराडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून साहिलला अटक केली.

पोलिस फरार तौफिकचा शोध घेत आहेत. साहिलविरुद्ध आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. डॉक्टरच्या मदतीने खंडणी उकळण्याचा प्रकरणात साहिल चर्चेत आला होता. पोलिसांनी त्याला न्यायालयात सादर केले असता, न्यायालयाने त्याची एक दिवसाची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.