esakal | Nagpur: नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले
sakal

बोलून बातमी शोधा

accident news

नागपूर : नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाजारगाव (जि. नागपूर) :अमरावतीकडून नागपूरकडे जाणारी कार राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी शिवारात नादुरुस्त झाली. नादुरुस्त कारला मागून धक्का मारत असताना तिघा तरुणांना मागून अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात एक तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले. एकाला किरकोळ मार लागला.

कारने (क्रमांक एमएच३१, एफई५०८८)आकाश मुरलीधर अडसुले (वय३१), सुमीत रमेश नागदेवे (वय३१, दिगोरी नागपूर), अश्विन जगन्नाथ वाकोळीकर (वय३२, तांडापेठ पांचपावली नागपूर), आकाश जगन्नाथ वाकोळीकर (वय३०, तांडापेठ पांचपावली नागपूर) हे चौघे तरुण अमरावतीकडून नागपूरकडे जात होते. कोंढाळी-नागपूर मार्गावर कारचे टायर पंक्चर झाले म्हणून त्यांनी टायर बदलले. पण टायर बदलल्यानंतर अनेक वेळा प्रयत्न करुनही कार सुरू झाली नाही, म्हणून सर्वांनी मदतीसाठी महामार्गाने येणाऱ्या वाहन चालकांना थांबविण्यांचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेनंतर दोन कार थांबल्या.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

त्यातील एका कारच्या चालकांने बंद कारच्या स्टेरिंगवर बसून कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. कारला मागून आकाश, सुमीत, अश्विन, आकाश हे चौघेही धक्का मारत असताना सातनवरी शिवारातील जुनघरे पोट्री फार्मनजीक आज पहाटे तीनच्या सुमारास मागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने या तरुणांना व कारला मागून जबर धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. कारच्या स्टेरिंगवर बसलेली अज्ञात व्यक्तीही निघून गेली. ट्रकच्या धडकेने आकाश मुरलीधर अडसुले (वय३१)याचा जागीच मृत्यू झाला. सुमीत नागदेवे व अश्वीन वाकोळीकर हे देघे अत्यंत गंभीर जखमी झाले.

आकाश वाकोळीकर हा किरकोळ जखमी झाला. मृत व जखमी रोडवर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच एएसआय दिलीप इंगळे व पोलिस नायक प्रशांत कुंभारे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व मदत, बचावकार्य सुरु केले. नंतर घटनास्थळी कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कदम हेसुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांसह पोहोचले. मृत व जखमींना नागपूर रवाना केले. कोंढाळी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध अपघातांचा गुन्हा नोंदविला.

loading image
go to top