Nagpur Accident : माय-लेकीला टॅंकरने चिरडले; दोन जुळ्या मुली, एक गेली एक वाचली

मिळालेल्या माहितीनुसार, विरूळ येथील राजकुमार नामदेव सयाम (वय ३५) हे त्याची पत्नी निलिमा व दोन जुळ्या मुलींना घेऊन एमएच ४० एजे ३६४६ क्रमांकाच्या दुचाकीने नेरपिगळाई येथील लग्नाला जाण्यासाठी निघाले होते.
 accident
accident sakal

आर्वी/ विरुळ - लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर झालेल्या आघातात माय लेक जागीच ठार झाली तर बाप-लेक गंभार जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आर्वी- पुलगाव मार्गावरील बाजारवाडा फाटा येथे शनिवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. नीलिमा सयाम (वय २७), तनुष्का सयाम (दीड वर्षे) अशी मृतांची नावे आहे. तर राजकुमार सयाम आणि दुसरी जुळी मुलगी रियांशी गंभीर जखमी आहे.

 accident
Mumbai : सहकारी गृहनिर्माण परिषदेत झालेल्या घोषणांचे जीआर कधी; आमदार प्रवीण दरेकर

मिळालेल्या माहितीनुसार, विरूळ येथील राजकुमार नामदेव सयाम (वय ३५) हे त्याची पत्नी निलिमा व दोन जुळ्या मुलींना घेऊन एमएच ४० एजे ३६४६ क्रमांकाच्या दुचाकीने नेरपिगळाई येथील लग्नाला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान बाजार वाडा फाट्याजवळ अचानक जी.जे.१६ डब्ल्यू २४४५ क्रमांकाचा टॅंकर दुचाकीकडे वळला.

 accident
Mumbai : एमआयडीसी जलवाहिनीवर भराव टाकून अवजड वाहनांची वाहतूक

टँकर वळल्याचे दिसताच दुचाकीचे नियंत्रण बिघडले. यात पाठीमागे बसून असलेली निलिमा आणि मुलगी तणुष्का या दोन्ही खाली पडल्या. दरम्यान टँकरच्या मागील चाकांमध्ये दोघीही सापडल्याने चिरडल्या गेल्या. यात दोघींचाही घटनास्थळी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी घटनस्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळाचा पंचानामा करून या प्रकरणी टॅकर चालक राचल विद्यासागर पडेल (वय ३८) रा. सायकर (गुजरात) याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आर्वी पोलिस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com