राष्ट्रवादीचे टार्गेट नागपूर विधानसभा; दिलीप वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

राष्ट्रवादीचे टार्गेट नागपूर विधानसभा; दिलीप वळसे पाटील

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास उत्तमच अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असे स्पष्ट मत राज्याचे माजी गृहमंत्री तसेच नागपूरचे संपर्क नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी आम्हाला नागपूर विधासभासुद्धा लढायची असल्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादीचे इरादे स्पष्ट केले.

संपर्क नेते या नात्याने नागपूरच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि सभा घेण्यासाठी आपण नागपूरला आलो आहोत. महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करीत आहोत. आज शहरात दोन सभा घेण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीची बैठक वळसे पाटील यांनी घेतली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना पाटील म्हणाले, आम्ही महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करीत आहोत. महाविकास आघाडी व्हावी असे सर्वच नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्व सोबत आले तर उत्तमच अन्यथा आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. आम्हाला नागपूर विधानसभेतसुद्धा लढायची आहे. नागपूर जिल्ह्यात आमचे दोन आमदार होते. विदर्भात अनिल देशमुख यांच्यासह ११ आमदार निवडून आले आहेत. आता नव्याने जोडणी केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे राज्यात पंधरा वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. यात राष्ट्रवादीसाठी नागपूर शहरात एकही विधानसभा मतदारसंघ आजवर सोडण्यात आला नाही. पूर्व नागपूर राष्ट्रवादीला सोडण्यात यावा याकरिता अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या विधानसभेसाठी सुरू असलेल्या आग्रहामुळेच काँग्रेसमार्फत महापालिकेत आघाडी करण्यास विरोध दर्शविला जात आहे.

शिवसेनेतील फुटीचा फायदा राष्ट्रवादीला होईल का? यावर ते म्हणाले की, आम्हाला दुसऱ्यांच्या वादाचा फायद नको आहे. आम्ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहोत. पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. २४ तास पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्याचे काय झाले तुम्हा सर्वांनाच ठावूक आहे. यावेळी दुनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे, प्रकाश गजभिये, ईश्वर बाळबुधे, प्रवीण कुंटे पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Nagpur Assembly Election Ncp Municipality Mva Dilip Walse Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..