Nagpur : सहायक कामगार आयुक्ताला लाच घेताना अटक Nagpur Assistant Labor Commissioner arrested taking bribe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bribe

Nagpur : सहायक कामगार आयुक्ताला लाच घेताना अटक

नागपूर : तीस हजार रुपयांची लाच घेताना सहायक कामगार आयुक्तांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विनय कुमार जयस्वाल असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याने दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून लाच घेतल्याची माहिती आहे.

सार्वजनिक उद्योगशीलता विभाग (पीएसयू) विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतर शासकीय सदनिका परत केली नव्हती. त्यामुळे विभागाने त्यांच्या ग्रँच्युईटीचे प्रकरण सहायक कामगार आयुक्त कार्यालय सीजीओ कॉम्पलेक्स, सेमिनरी हिल्स येथे वर्ग केले होते. दोघांचीही ग्रँच्युईटीचे रक्कम सहायक कामगार आयुक्त कार्यालय येथे जमा केली होती.

गेल्या आठवड्यात दोघेही ती रक्कम मिळविण्यासाठी कार्यालयात गेले. सहायक कामगार आयुक्त विनय कुमार जयस्वाल याने दोघांना प्रत्येकी ३० हजार असे एकूण ६० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती दोघांचेही ३० हजार रुपये घेण्याचे ठरले. कर्मचाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार केली.

पोलिस उपमहानिरीक्षक एम. एस. खान यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी दुपारी विनय कुमार जयस्वाल यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने अटक केली. जयस्वाल यांच्या घराची सीबीआयचे झाडाझडती घेतली असून काही रक्कम आणि कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.