नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार

मुलाखतीला नेण्याचे सांगून पडक्या घरात नेले
crime
crimesakal

नागपूर - एका तरुणीला नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

नीलेश योगेश्वर हेडाऊ (वय ४०, रा. हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा म्हाडा कॉलनी, भंडारा येथील राहणारा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही २४ वर्षाची असून उच्चशिक्षित आहे. तिचे वडील अपंग आहे. आईचे आजारपणात निधन झाले. लहान बहिणीसह ती अंबाझरी परिसरात राहते. वडिलांची जबाबदारी आणि लहान बहिणीच्या शिक्षणाचा खर्च बघता तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

२८ जूनला पीडित तरुणी मोरभवन बसस्थानकावर बसली होती. दरम्यान, तिची नीलेश हेडाऊशी भेट झाली. त्याने हॉटेल व्यवसायी असल्याचे सांगून ओळख दिली. नोकरी लावून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नीलेशने स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला. ३ जुलै रोजी दुपारी त्याचा फोन आला. त्याने नोकरीसाठी मुलाखतीला कोराडी परीसरातील एका हॉटेलमध्ये जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तासभरात तयारी केली आणि गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचली. त्याने दुचाकीने तिला पारडी रोडने एका मंदिराजवळील पडक्या घरात नेले. तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.

नोकरी हवी असेल तर शारीरिक संबंध ठेवण्याची अट ठेवली. तिने नकार देऊन घरी सोडण्याची विनंती त्याला केली. अंधारात कुणीही मदतीला नसल्याचे बघून तिच्यावर बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तिला घरी आणून सोडले आणि पळ काढला. पीडित तरुणीने अंबाझरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com