सावधान! नागपुरकरांसाठी धोक्याची घंटा; एकाच दिवशी आढळले ३ हजार ३७० रुग्ण; १६ जणांचा मृत्यू 

Nagpur becoming corona hotspot new 3370 cases today
Nagpur becoming corona hotspot new 3370 cases today

नागपूर ः कोरोनाने आता जिल्ह्यात चांगलेच हात पाय पसरले असून मागील वर्षभरात दर दिवसाला आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा रेकार्ड मोडला. बुधवारी (ता.१७) एकाच दिवशी तब्बल ३ हजार ३७० बाधितांची नोंद झाली. तर २४ तासांमध्ये १६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७८ हजार ७५६ वर पोहचला आहे. यापैकी ४ हजार ५०५ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्यानंतर मात्र आता कोरोना गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास प्रचंड जीवहानी होण्याचा धोका वैद्यक तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

एखाद्या क्रिकेटच्या आकडेवारीप्रमाणे दर दिवसाला कोरोनाबाधितांचा एक नवा विक्रम तयार होत आहे. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शहरातील मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड गतीने वाढत आहेत. बुधवारी नव्याने शहरात २ हजार ६६८ कोरोनाबाधित आढळून आले. 

हा देखील एक नवीन विक्रमच नोंदवला आहे. तर ग्रामीण भागातही एकाचवेळी ६९९ कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद झाली आहे. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ४२ हजार ८३९ वर पोहचला आहे. तर ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजार ९३० झाली आहे. तर आज झालेल्या १६ मृतांमध्ये शहरातील ८ तर ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरच्या ३ मृत्यूंची नोंद झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या साडेचार हजार पार झाली आहे.

जिल्ह्यात १५ हजार चाचण्या

बुधवारी १ हजार २१६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत कोरोनावर १ लाख ५३ हजार १३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दर दिवसाला कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे कोरोनामुक्तांची टक्केवारी कमी होत आहे. ९६ टक्क्यांवर पोहचलेला कोरोनामुक्तीचा दर पंधरा दिवसात ११ टक्क्यांनी घसरला आहे. कोरोनामुक्तीचा दर ८५.६७ टक्क्यावर आला आला. ही अतिशय गंभीर बाब आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी लॉकडाउन लावले. प्रशासनाकडून वारंवार घराबाहेर निघू नका असे आवाहन करण्यात येत आहे, मात्र याकडे जनताने दुर्लक्ष केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com