नागपूर पुन्हा पॉवर सेंटर !

फडणवीस पुन्हा येणार : वैदर्भीयांमध्ये आनंदोत्सव
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला असून पुन्हा एकदा राज्यात नागपूर शहराचा दबदबा वाढणार आहे. त्यामुळे भाजपचेच कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण वैदर्भीय जनतेत आनंदाची लाट आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता. पाच वर्षे ते मुख्यमंत्री होते. मी परत येणार अशी घोषणा त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती. जनतेने युतीला सत्तेचा कौलसुद्धा दिला होता. मात्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बिनसल्याने महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. त्यामुळे फडणवीस यांना विरोधात बसावे लागले होते.

युतीच्या कार्यकाळात सर्व फोकस नागपूरवर होता. केंद्रात नितीन गडकरी, राज्यात फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांमुळे नागपूरचा दबदबा चांगलाच वाढला होता. फडणवीस यांचे विरोधात जाताच आघाडी सरकारने त्यांचे अनेक निर्णय फिरवले. त्यात प्रामुख्याने विदर्भाच्या विकासाच्या प्रकल्पांचा समावेश होता. विदर्भ वैधानिक मंडळाची पुनर्गठणसुद्धा करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे वैदर्भीयांमध्ये पुन्हा एकदा अन्यायाची भावना निर्माण होऊ लगली होती. मात्र शिवसेनेच्या आमदारांनी बंड करून फडणवीस यांच्या हातात पुन्हा मुख्यमंत्र्यांची धुरा फडणवीस यांच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे मी पुन्हा येईल हे फडणीस यांनी खरे करून दाखवले.

फडणवीस यांच्या कार्यकाळात नागपूर राज्याचे मुख्य केंद्र झाले होते. याच काळात विकासासाठी सर्वाधिक निधी नागपूर महापालिकेला मिळला होता. समृद्धी मार्ग, गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय, रखडलेल्या सिंचनाचे प्रकल्पांना मिळाला होता. फडणीस यांनी आपल्या नेतृत्व आणि कार्यकौशल्याने वैदर्भीय आळीशी अशी प्रतिमा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा केली होती. आता शिवसेनेच्या बंडात मुंबईसह पश्चिमेतील बहुतांश आमदारांचा समावेश आहे. बंडखोर आमदारांनी दिलेल्या प्रस्तावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे अशी मागणी केली होती. त्यामुळे पश्चिमेतील आमदारांनी वैदर्भीयांकडे नेतृत्व सोपवल्याचे यावरून स्पष्ट होतो. राजधानीतील उद्धव ठाकरे यांच्यावर उपराजधानीतील फडणवीस यांनी मात केली आहे.

मंत्रीमंडळातील संभाव्‍य चेहरे

भारतीय जनता पक्षाच्या नव्या सरकारमध्ये विदर्भातील सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू, संजय कुटे, संजय राठोड, संजय कुटे, संजय रायमुलकर आणि रणधीर सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार समीर मेघे, कृष्णा खोपडे, माजी राज्यमंत्री परिणय फुके, भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यापैकी काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता मंत्रिमंडळाची स्थापना करताना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com