नागपूर : बंद रेल्वे थांबे लवकरच होणार पूर्ववत

रेल्‍वे राज्‍यमंत्र्‍यांची नागरिकांच्‍या मागणीशी सहमती
Nagpur Closed Railway stations reopen Railway Minister agree with citizen demands
Nagpur Closed Railway stations reopen Railway Minister agree with citizen demandssakal

जलालखेडा : दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नरखेड, काटोल शहरातील रेल्वे प्रवाश्यांच्या मागणीला मूर्तरूप आले आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मंगळवारी बैठक होऊन यामध्ये रेल्वेचे वेळापत्रक करण्याचे आदेश रेल्वे विभागाला देण्यात आले. त्यानंतर रेल्वे विभाग ॲक्सन मोडवर आला आहे. त्यामुळे काटोल, नरखेड येथील यापूर्वी बंद करण्यात आलेले थांबे येत्या सात दिवसात पूर्ववत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून नगर परिषद नरखेडचे माजी अध्यक्ष अभिजित गुप्ता यांना मिळालेली आहे.

कोरोना संक्रमनाच्या काळापूर्वी नरखेड जंक्शनवर दहा ते बारा एक्सप्रेस रेल्वे गाड्याचा थांबा होता. त्यामुळे नरखेड, काटोल येथील शिक्षण घेणारे विद्यार्थी, व्यापारी, नोकरशाह, रुग्ण हे एका तासात नागपूर गाठून आपली कामे पूर्ण करून वेळेआधी घरी परत येत होते. त्याच बरोबर दिल्ली, भोपाळ, इटारसीकडे आवागमन करणे सोईचे होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे परिस्थिती पूर्ववत होऊन सुद्धा सुरु न झाल्यामूळे नागरिकांना प्रवासाची फार मोठी समस्या भेडसावत होती. त्यासाठी सतत मागणी, आंदोलनांचा प्रयत्न करण्यात आला.

यासाठी रेल्वेचे डीएमआर, जीएम, रेल्वे मंत्री, स्थानिक खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदने देण्यात आली. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर शहरातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागरिकांची प्रवासाची समस्या सोडवावी अशी विनंती केली. त्यानंतर नितीन गडकरी यांनीच मध्यस्थी करीत शिष्टमंडळाला दिल्ली येथे बोलवून घेत रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव व रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे अधिकारी यांची बैठक घेऊन नरखेड, काटोल येथील रेल्वे थांब्याला ‘ग्रिन सिग्नल’ देण्याचे आदेश दिले. नरखेड येथील शिष्टमंडळ व न. प. चे माजी अध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे संकेत मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com