नागपूर : सरकार कडून मूकबधिरांच्या एकाच कानावर होते शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Cochlear Implants ear surgery

नागपूर : सरकार कडून मूकबधिरांच्या एकाच कानावर होते शस्त्रक्रिया

नागपूर - केंद्रशासनाच्या ॲडिप योजनेअंतर्गत गरीब कर्णबधिर मुलांना ऐकू यावे उदात्त हेतूने ‘कॉक्लियर इम्प्लांट’ ची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. मेयो आणि मेडिकलमध्ये मागील पाच वर्षांत शंभरपेक्षा अधिक कर्णबधिर मुलांना याचा लाभ झाला आहे. मात्र, सरकार एकाच कानावर शस्त्रक्रियेसाठी निधी देते. त्यामुळे दोन्ही कानांच्या ‘कॉक्लियर इम्प्लांट’ निधी देण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. सरकार, मात्र मुकबधिरांना एकाच कानाने ऐका असे सांगते.

केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत ‘कॉक्लियर इम्प्लांट’साठी सहा ते साडेसहा लाखाचा निधी मंजूर होतो. यानंतर हे यंत्र शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या रुग्णालयाला पुरविण्यात येते. केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून निधी मिळतो. एकाच कानासाठी हे यंत्राचा खर्च मिळतो. जन्मानंतर मूल बोलू शकत नसल्यामुळे किमान दोन वर्षांपर्यंत आई वडिलांना ते कर्णबधिर असल्याची माहिती मिळत नाही. जर मूल बोलू शकत नसेल, तर त्याला ऐकूही येत नाही. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यास १५ ते १८ लाखांचा खर्च येतो.

मेयो, मेडिकल वरदान

नागपुरात २०१७ मध्ये मेयो रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट सुरू झाले. तर २०१८ मध्ये मेडिकलमध्ये हे केंद्र तयार करण्यात आले. मेयोत आतापर्यंत ५६ तर मेडिकलमध्ये पन्नासपेक्षा अधिक गरीब मूकबधिर मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली.

कॉक्लियर इम्प्लांट प्रोस्थेटिक यंत्र

कॉक्लियर इम्प्लांट हे प्रोस्थेटिक यंत्र आहे. आतील कानाच्या कोक्लियामध्ये बसवले जाते. कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी कानाच्या मागे छिद्र केले जाते. इलेक्ट्रोड्स कॉक्लियाच्या आत ठेवलेले असतात. कानाच्या मागे असलेल्या मास्टॉइड हाडात रिसिव्हर उत्तेजक पॅकेज ठेवले जाते. श्रवणयंत्र कानापर्यंत ध्वनी प्रसारित करण्यास मदत करते. त्याचप्रमाणे कॉक्लियर इम्प्लांट कानातल्या कॉक्लियाच्या मज्जातंतूंमध्ये आवाज पोहचवते. इम्प्लांटनंतर ऑडिओलॉजिस्ट आणि सर्जनद्वारे निरीक्षण केले जाते. मुलांना ऐकण्याची आणि बोलण्याची थेरपी दिली जाते. यंत्रामध्ये बाह्य भाग देखील असतो जे कानाच्या बाहेर ठेवायचा असतो. हे यंत्र बॅटरीवर आधारित आहे. कानातील यंत्र आयुष्यभर काम करते. बाह्य मशिन बॅटरीवर आधारित आहे.

Web Title: Nagpur Cochlear Implants Ear Surgery Deaf Central Government Fund

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..