नागपूर : कसा मिळणार नामांकित महाविद्यालयांत प्रवेश?

‘सीबीएसई’ चे विद्यार्थी चिंतेत : महाविद्यालयांचे प्रवेश सुरू
Nagpur College admissions open
Nagpur College admissions opensakal

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संकेतस्थळावर २७ जूनपर्यंत नोंदणी करणे आवश्‍यक होते. मात्र, अद्याप सीबीएसई बारावीचा निकालाची घोषणा न केल्याने या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणे शक्य नसून त्यांना मनपसंत महाविद्यालये मिळणार कशी? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

राज्य शिक्षण मंडळाद्वारे ८ जूनला बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून विद्यापीठाद्वारे पदवी प्रवेशाचे वेळापत्रक दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची होती. सोमवारी ती मुदत संपली. त्यानुसार केवळ ४३ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी केली. विद्यापीठाच्या जागा बघता झालेली नोंदणी बरीच कमी आहे. मात्र, या नोंदणीच्या आधारावर ज्यांनी महाविद्यालयात अर्ज केलेत, त्यांच्या प्रवेशाची यादी गुणवत्तेनुसार लावण्यात येणार आहे.

दरवर्षी शहरातील काही नामांकित महाविद्यालयामध्ये पहिल्याच यादीमध्ये प्रवेश फुल्ल होत असतात. अशावेळी ज्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली नाही, वा ज्यांना ती करता आली नाही अशा विद्यार्थ्यांचा हिरमोड होत असतो. विशेष म्हणजे, अद्याप सीबीएसई बारावीच्या निकालाची घोषणा झालेली नाही. येथील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात चांगल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असतात. मात्र, निकालाअभावी त्यांची नोंदणीच झाली नसल्याने त्यांचा नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेश हुकणार आहे.

विद्यापीठाची भूमिका

विद्यापीठाद्वारे २७ जूनला संकेतस्थळावरील नोंदणी बंद केली. नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी व महाविद्यालयांकडून करण्यात आली. मात्र, त्यावर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी पहिल्या यादीतील प्रवेश संपल्यावर प्रतीक्षा यादीमध्ये त्यांना प्रवेश खुले करीत, त्यातून प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट करीत, त्यावेळी विद्यापीठाचे संकेतस्थळ खुले करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर ज्याने अर्ज केलेत, त्यांचीच प्रतीक्षा यादी महाविद्यालयांना लावता येणार आहे. त्यामुळे नव्याने नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात कसा प्रवेश मिळेल? हा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com