Nagpur : महिलेची संपत्ती हडपण्याचा कट; मन्नत बाबावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news nagpur

Nagpur : महिलेची संपत्ती हडपण्याचा कट; मन्नत बाबावर गुन्हा

नागपूर : कर्करुग्ण महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत तिची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्यप्रदेशातील मन्नत बाबासह त्याच्या साथीदारांवर सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करीत महिलेची फसवणूक केली.

हेही वाचा: Nagpur : पोषण आहार व्यवहाराची आयकर चौकशी?

मन्नत बाबा उर्फ ​​संजयकुमार सिंग ( मृणाल रेसिडेन्सी-४), देविदास गावंडे (गड्डीगोदाम), गीता देविदास गावंडे, धीरज गावंडे, कुणाल गावंडे यांच्यासह दिनेश आचार्य (शिवाजीनगर) आणि प्रमोद डवले (सुरेंद्रनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मध्यप्रदेश मंत्रालयात (भोपाळ) काम करणाऱ्या कुसुम शंभरकर यांना मुलंबाळ नव्हत. त्यांनी प्रियंकाला बालपणीच दत्तक घेतले होते. ती मुळात नागपूरची रहिवासी असून तिची मालमत्ता नागपुरात आहे.

हेही वाचा: Nagpur : दिवाळीच्या तोंडावर झोपड्या तोडणे अमानवीय

प्रियांकाचे पालनपोषण कुसुम यांनी केले. त्यांची भोपाळमध्ये आरोपी मन्नत बाबाशी ओळख झाली. २००९ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या नागपुरातील एका घरात राहत होत्या. त्यांना मानकापूर येथील खासगी रुग्णालयात ९ सप्टेंबर २०२१ रोजी कर्करोगामुळे दाखल करण्यात आले. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी डिस्चार्ज देण्यात आला. ५ डिसेंबर २०२१ रोजी कुसुम यांचे कर्करोगाने निधन झाले.

हेही वाचा: Nagpur : बेघरांवर पोलिस बळाचा वापर

अंत्यसंस्कारा्नंतर मन्नत बाबा कुसूमच्या घरी पोहोचला. कुसुमने मोहननगर येथील फ्लॅट मन्नत बाबा आणि तर बाबादीपसिंगनगर येथील प्लॉट त्याचा मामा देविदास यांचा मुलगा धीरजच्या नावावरही केले आहे. असे त्याने सांगितले. याबाबत प्रियंका यांनी तक्रार दाखल केली. तपासात कुसुम यांच्यावर उपचार सुरू असताना अचानक १५ सप्टेंबरला त्यांना दवाखान्यातून संजयकुमार सिंग उर्फ ​​मन्नत बाबा आणि तिच्या मामाच्या मुलाने घरी घेऊन गेले होते.

हेही वाचा: Nagpur : दिग्गजांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट

दुसऱ्या दिवशी मन्नत बाबा यांनी फ्लॅट आणि बाबादीपसिंगनगर येथील घरही नावावर करुन घेत कुसुम यांना पुन्हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. याबाबत एनजीओ अॅक्शन कमिटी आणि अॅडव्हीव्ही महंत यांनी प्रियांकाच्या वतीने न्यायालयात दाद मागितली होती.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यातून सदर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.