Nagpur: कोरोनापेक्षा डेंगीग्रस्तांची तिपटीने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी रोखणारे डास विकसित

नागपूरात कोरोनापेक्षा डेंगीग्रस्तांची तिपटीने वाढ

नागपूर : कोरोना विषाणूचे संकटाचा सामना २० महिन्यांपासून सुरू असतानाच डेंगीचा उद्रेक जिल्ह्यात झाला. सद्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव कमी झाला. १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान नागपूर जिल्ह्यात अवघे २१ कोरोनाबाधित आढळले. तर डेंगीचे ७७ रुग्ण आढळून आले. तीन पटीपेक्षा जास्त पटीने वाढल्यानंतरही डेंगीबाबत प्रशासन उदासीन आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २०८ डेंगीग्रस्तांची नोंद झाली असून १० जणांचा मृत्यू झाला.

नागपूर जिल्ह्यात १ आणि २ नोव्हेंबरला प्रत्येकी ५ जण कोरोनाबाधित आढळले. तर ३ नोव्हेबंरला ३ जण बाधित होते. ४ नोव्हेबरला जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधताची नोंद झाली नाही. ५ नोव्हेंबरला अवघे २ तर ६ नोव्हेंबरला १ बाधित आढळला. ७ नोव्हेंबरला पुन्हा ५ जण आढळले. अशाप्रकारे जिल्ह्यात ७ दिवसात केवळ २१ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मात्र १ ते ७ नोव्हेंबर या सात दिवसांत नागपूर शहरात ५३ तरे ग्रामीण भागात २४ असे एकूण ७७ डेंगीग्रस्त आढळून आले आहेत.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

डेंगीचा उद्रेक असताना किटचा तुटवडा

नागपू जिल्ह्यात डेंगीचा उद्रेक सुरू आहे. ऑक्टोंबर महिन्यात कोरोनाचे अवघे १४९ बाधितांची नोंद झाली होती. तर डेंगीच्या तीन आठवड्यातील डेंगीग्रस्तांची नोंद सुमारे १५० होती. तर एक आठवडा डेंगी तपासणीच्या कीट नसल्यामुळे आठवडाभर शुन्य डेंगीग्रस्त अशी नोंद करण्यात आली. सद्या किट उपलब्ध नसल्यामुळे तपासणीचा घोळ कायम असल्याची जोरदार चर्चा पसरली आहे.

loading image
go to top