नागपूर : मनपाचा शाळांवर प्रथमच दंड

कोविड नियमाचे उल्लंघन; ३४ शाळा, कॉलेजची पाहणी
nagpur municipal corporation
nagpur municipal corporationsakal

नागपूर : राज्य सरकारने शहरातील हायस्कूल व कॉलेजला परवानगी दिली असून सोशल डिस्टन्सिंग, शिक्षकांचे लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने आज दोन शाळा, महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई केली. शाळा, महाविद्यालयांवर कोविड नियमाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ही शहरातील पहिलीच कारवाई आहे.

महापालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज कोविड नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. राज्य सरकारने शहरात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, शिक्षकांना दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले आहे.

nagpur municipal corporation
अकोला : आरोग्यसेविकांचे काम बंद आंदोलन

उपद्रव शोध पथकाने आता आस्थापना, धार्मिक स्थळे, मंगल कार्यालयासोबतच शाळा, महाविद्यालयाचीही तपासणी करण्यास सुरवात केली. उपद्रव शोध पथकाने सोमवारी दोन शाळांसह ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करीत १५,००० रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ४५ मंगल कार्यालय, २५ मंदिरे, ११ मस्जिद, ३४ शाळा, कॉलेज आणि अन्य १० धार्मिक स्थळांची पाहणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांने कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आशीनगर झोनमधील कबीरनगरातील शकुंतला पब्लिक स्कूल व टेका नाका येथील सायोना पब्लिक स्कूलवर प्रत्येकी पाच हजारांचा दंड केला. याशिवाय धरमपेठ येथील मेसर्स गुरुंग मोमोवरही पाच हजारांचा दंड केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com