Nagpur Crime: 'एकतर्फी प्रेमातून परिचारिकेवर हल्ला'; जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा, ५० हजाराचा ठोठावला दंड
2020 Nagpur WhatsApp Fraud Case: या प्रकरणात न्यायाधीश नितीन जाधव यांनी निर्णय दिला. ही घटना ८ डिसेंबर २०२० रोजी घडली होती. पीडिता नंदनवन येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती. प्रशांतने व्हॉट्सॲपवर ‘मुस्कान’ नाव ठेवून स्वतःला मुलगी असल्याचे भासवत मैत्री केली.
नागपूर : एकतर्फी प्रेमातून परिचारिकेवर हल्ला करणाऱ्या युवकास जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा, ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रशांत भरसागडे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.