
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करुन आक्षेपार्ह मजकूराची `फेक पोस्ट' समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे.
Nitin Gadkari : फेक पोस्ट प्रकरणी गडकरीं यांची पोलिसात तक्रार
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करुन आक्षेपार्ह मजकूराची `फेक पोस्ट' समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. त्यामध्ये आपत्तीजनक मजकूर लिहिण्यात आला आहे. ही गंभीर बाब आहे. गडकरी यांनी सुद्धा याप्रकरणाला गंर्भीयाने घेतले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यालयाकडून थेट सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी तक्रारीद्वारे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नावे दत्तात्रय जोशी नावाच्या अकाऊंटवरून काही आक्षेपार्ह मजकूर अनेक व्हॉट्सअँप ग्रूपवर पसरविण्यात आला. त्यात आक्षेपार्ह लिहिण्यात आले होते. त्या पोस्टमुळे धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघण्याची शक्यता आहे. हा खोडसाळ प्रकार केल्यामुळे अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे गडकरी यांच्या कार्यालयात या 'फेक पोस्ट'बाबत माहिती मिळाली.
गडकरी यांच्या ट्वीटरवरून माहिती देऊन सदर 'व्हायरल पोस्ट' करणार्याविरुद्ध नागपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोस्ट प्रसारित करणार्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. पोस्ट `फेक' असल्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. `ना. गडकरींच्या नावाची बदनामी करणारा मजकूर समाजमाध्यमांवर पसरविणार्याविरुद्ध तक्रार आली असून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे', अशी माहिती सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.