Nagpur: अतिक्रमणधारकांचा पीएसआयवर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

नागपूर : अतिक्रमणधारकांचा पीएसआयवर हल्ला

नागपूर : महानगरपालिकेच्यावतीने बुधवारी गांधीबाग झोनमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई सुरु असताना काही अतिक्रमणधारकांनी पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.

बुधवारी सकाळी पोलिसांच्या सुरक्षेत अतिक्रमण उन्मूलन पथक कारवाई करण्यासाठी सूत मार्केटमध्ये धडकले असता अतिक्रमणधारकांनी जोरदार विरोध केला. मनपा अधिकाऱ्यांसोबत वाद करीत शिवीगाळ केली. पथकाच्या सुरक्षेत असलेल्या पोलिस उप निरीक्षकांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

पण अतिक्रमणधारकांनी त्यांच्याशीही वाद घालत हल्ला केला. तसेच धक्काबुक्की धक्काबुक्की करणे सुरू केले. हा प्रकार पाहून पोलिसांनी अतिक्रमणधारकांना घेरले. त्यामुळे परिस्थिती आणखीच चिघळली. यादरम्यान काही अतिक्रमणधारक उपनिरीक्षकांना मारण्यास धावले. पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर मोठ्या संख्येत अतिरिक्त पोलिस बल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या अतिक्रमणधारकांना दोन-तीन तास ताब्यात ठेवले. त्यानंतर एनसी दाखल करून त्यांना सोडण्यात आले. परंतु संपूर्ण कारवाईदरम्यान सूत मार्केटमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. पथकाने येथून दोन ट्रक सामानही जप्त केले.

कारवाईचा धडाका सुरूच

हनुमान झोनमध्येही पथकाने तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा, उदयनगर, म्हाळगीनगर चौक, परतीवर उदयनगर चौक ते मानेवाडा चौक, तुकडोजी चौक ते क्रीडा चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथवर बनलेली अवैध दुकाने हटविली.

loading image
go to top