
Nagpur crime news : महिलेवर चाकू हल्ला ; चौघांना अटक
नागपूर : अजनीतील रहाटेनगर टोली परिसरात चार ते पाच जणांनी महिलेवर हल्ला करीत चाकूने वार केले. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी नागरिकांनी रोष व्यक्त करीत पोलिस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
काया उफाडे (वय ५०),असे जखमी महिलेचे नाव आहे. उत्तम मानकर (वय ५५), संजय मानकर (वय ३०), जय मानकर (वय २८), अमन उखाडे (वय २५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
काया उफाडे यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या आणि नातेवाईक असलेल्या उत्तम मानकर (५५), संजय मानकर (३०), जय मानकर (२८), अमन उखाडे (२५), रोहन हातागडे (२२) आणि साथीदारांसोबत वाद झाला. त्यामुळे उफाडे यांचे कुटुंबीय आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले होते.
दरम्यान पाचही जणांसह त्यांच्या साथीदारांनी महिलेची सून काया उफाडे हिच्या तोंडावर, डोक्यावर चाकुने वार करून गंभीर जखमी केले. जखमी काया उफाडे हिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. अजनी पोलिस ठाण्यात नागरिकांनी घेराव घातला आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली.