प्रियकरान आवळाला प्रेयसीला गळा; ठार मारण्याचा प्रयत्न

कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाळीस वर्षीय प्रेयसीचा गळा प्रियकराने आवळून खून करण्याचा प्रयत्न
nagpur crime update boyfriend attempt to kill his girlfriend
nagpur crime update boyfriend attempt to kill his girlfriendesakal

नागपूर : कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाळीस वर्षीय प्रेयसीचा गळा प्रियकराने आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणात प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

सोमेश (वय २६, रा. हुडकेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून त्याने महिलेसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू आहे. तिने सोमेश याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. त्यामुळे सोमेश संतापला.

सोमवारी (ता. २८) दुपारी तो महिलेच्या घरात घुसला. त्याने तिला पैशाची मागणी केली. महिलेने नकार दिला. त्याने तिला शिवीगाळ केली व परत गेला. काही वेळाने पुन्हा तो महिलेच्या घरी आला. यावेळी तो दारू प्यायला होता. त्याने पुन्हा शिवीगाळ केली. दोरीने तिचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केली. सोमेश पसार झाला. महिलेने कोराडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमेशचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com