नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून शाळकरी मुली ‘टार्गेट’

ऑनलाईन लैंगिक अत्याचाराच्या बळी : पालकांनी गांभीर्य दाखविणे गरजेचे
Cyber crime
Cyber crimeCyber crime

नागपूर : ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याने शाळकरी मुला-मुलींच्या हातात स्मार्टफोन देणे भाग आहे. परंतु क्लास संपल्यानंतर मुल-मुले सोशल मीडियाच्या आहारी जातात. याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्किंग साईटवरून शाळकरी मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करून पाठलाग करतात. त्यानंतर जाळ्यात ओढून त्यांची अश्लील छायाचित्रे आणि न्यूड व्हिडिओ तयार करतात. उपराजधानीत अशा बऱ्यास तक्रारी समोर आल्या असून, पालकांनी पाल्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात महाविद्यालयीन युवकांसोबतच शाळकरी मुला-मुलींचाही मोठा सहभाग आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर अकाऊंट तयार करून फॉलोअर्स वाढविण्याची स्पर्धा मुलांपेक्षा मुलींमध्ये सुरू आहे. मुलींचा मोठा टक्का इंस्टाग्रामवर असून, वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो टाकून मित्र-मैत्रिणीच्या संपर्कात राहण्यासाठी मुलींची धडपड सुरू असते.

Cyber crime
जेल की बेल? आर्यन खान 17 दिवसांपासून अटकेत; आज सुनावणी

याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार किंवा ओळखीतील युवक घेतात. विशेषतः शाळकरी मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यानंतर मुलींच्या सर्व फोटो आणि व्हिडीओवर लाइक्स करतात. त्यामुळे मुलीला कुणीतरी चांगला फॉलोअर असल्याचे वाटते. त्यानंतर असे गुन्हेगार मुलींना चॅटबॉक्समध्ये मॅसेज करून चॅटिंग करतात. व्हिडिओ आणि फोटोंचे कौतुक करून भूरळ घालतात. चॅटिंग करतानाच त्यांना मोबाईल नंबर मागतात. तसेच मुलींची कौटुंबिक स्थिती आणि आर्थिक स्थिती जाणून घेतात.

असे टाकतात जाळे

जरीपटक्यात सातवीतील मुलीशी आरोपीने चॅटिंग केल्यानंतर सुरुवातीला मुलींचे काही अर्धनग्न फोटो पाठवले. त्या फोटोकडे दुर्लक्ष केल्याने मुलीला अश्‍लील व्हिडिओ पाठवले. तिलाही तसेच फोटो पाठविण्यासाठी बळजबरी केली. फोटो न पाठविल्यास आईला ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी घाबरली आणि तिने स्वतःचे न्यूड फोटो आरोपीला पाठवले. त्यानंतर आरोपीने तिली व्हिडिओ कॉल करून नग्न होण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलीने लगेच मावशीला प्रकार सांगितला. पोलिसांनी ऑनलाईन लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला.

Cyber crime
नागपूर : मेयोत बारा तास मृतदेह पडून

पालकांनी काय करावे?

- मुलीला फक्त ऑनलाईन क्लाससाठीच मोबाईल द्यावा

- पाल्यांच्या मोबाईल ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवावे

- मुलींच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतः सहभागी व्हावे

- मुलींना व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यावर लक्ष ठेवावे

- मुलींचे व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम तपासावे

- मुलांची सोशल मीडियावरील पोस्टबाबत जागृती करावी

- पाल्यांशी सुसंवाद साधून मैत्रीपूर्ण संबंध जोपासावे

मुलींनो घाबरू नका

ऑनलाईन क्लासेस सुरू असल्यामुळे पाल्यांकडे मोबाईल देणे अनिवार्य आहे. परंतु पाल्य इतरवेळी मोबाईलमध्ये काय करतो, यावर पालकांनी लक्ष ठेवावे. मोबाईल वारंवार चेक करावा. सोशल मिडियाच्या अकाऊंट हाताळावे. मित्र आणि मैत्रिणींच्याही मॅसेज, चॅटिंग, व्हिडिओ आणि फोटोंरही लक्ष ठेवावे, जेणेकरून पाल्याचा ट्रॅक योग्य असल्याची खात्री होईल. परंतु कुणी त्रस्त करीत असल्यास दुर्लक्ष न करता थेट पोलिसात तक्रार करावी.

-केशव वाघ (सायबर क्राईम, नागपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com