Nagpur : वीस राष्ट्रांच्या झेंड्यांसाठी दिल्लीपर्यंत धावाधाव! Nagpur Delhi for flags of twenty nations | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 २० राष्ट्रांचे ध्वज लावण्याची बाब

Nagpur : वीस राष्ट्रांच्या झेंड्यांसाठी दिल्लीपर्यंत धावाधाव!

नागपूर : जी-२० बैठक अगदी तोंडावर आली असताना प्रशासनाची धावपळ होत असल्याचे चित्र आहे. या बैठकीसाठी येणारे विदेशी पाहुणे पेंच अभयारण्यातही जाणार आहेत. यानिमित्त तिथेही २० राष्ट्रांचे ध्वज लावण्याची बाब

आज जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली अन् धावाधाव सुरू झाली. अगदी दिल्लीपर्यंत ध्वजांबाबत विचारपूस झाली. दिल्लीतूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने निराश झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या मदतीला महापालिका धावून आली.

भारताने यंदाच्या जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यामुळे देशात परिषदेच्या बैठका सुरू आहेत. नागपुरात ही बैठक पुढील आठवड्यात होत असून प्रशासनाची लगीनघाई सुरू आहे. या बैठकीसाठी अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, कोरिया गणराज्य, मैक्सिको, रशिया, सऊदी अरब, दक्षिण आफ्रिका,

वीस राष्ट्रांच्या झेंड्यांसाठी दिल्लीपर्यंत धावाधाव!

टर्की, संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटन और युरोपीय संघाचे प्रतिनिधी सामील होणार आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी शहराचे सौंदर्यीकरण, रोषणाई करण्यात येत आहे. शहराच्या प्रमुख ठिकाणी या देशांचे ध्वज लावण्यात आले असून शहराला आंतरराष्ट्रीय ‘लूक’ आल्याचे दिसून येत आहे. बैठकीनंतर विदेशी पाहुणे पेंच अभयारण्यात व्याघ्रदर्शनाला जाणार आहेत. त्यामुळे येथेही या देशांचे ध्वज लावण्याचे प्रस्तावित होते. परंतु जी-२० निमित्त विविध कामांची जबाबदारी असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या नजरेतून ही बाब सुटली.

अखेर गुरुवारी अचानक पेंचमध्ये या देशांचे ध्वज लावण्याबाबत जाग आली. परंतु जिल्हा प्रशासनाकडे ध्वज शिल्लक नसल्याने दिल्लीपर्यंत ध्वज पुरविणाऱ्या कंपनीकडे विचारणा करण्यात आली. परंतु तेथेही ध्वज न मिळाल्याने जिल्हा प्रशासनाकडे महापालिकेकडे विचारणा केली. महापालिकेकडेही मोजकेच ध्वज होते.

परंतु जिल्हा प्रशासनाची कोंडी होत असल्याचे बघता महापालिकेने २० देशांच्या ध्वजांचा एक ‘सेट’ जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द केला. ध्वज मिळाल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.

ध्वजांवर ९२ लाखांचा खर्च

महापालिकेच्या जाहिरात विभागाने २० देशांच्या ध्वजांचे ३० ‘सेट’ खरेदी केले. शहरात २७ ठिकाणी हे ध्वज लावण्यात आले असून तीन ‘सेट’ विदेशी पाहुण्यांच्या जेवणाच्या ठिकाणी तसेच पोलिस आयुक्तालय कार्यालयात लावण्यात येणार आहे. जाहिरात विभागाने ५५ लाख रुपये यावर खर्च केला. मनपाच्या उद्यान विभागाने ३७ लाखांचे ९ ‘सेट’ खरेदी केले. उद्यान विभागानेही हे ध्वज शहरात लावले. ध्वजांवर एकूण ९२ लाखांचा खर्च करण्यात आला.