नागपूर : जिल्ह्यातील २२ शाळा अनधिकृत

शाळांना एक लाखांचा दंड, सर्वाधिक शाळा हिंगण्यातील
Nagpur district 22 schools are unauthorized 1lakh fine each school
Nagpur district 22 schools are unauthorized 1lakh fine each schoolSakal

नागपूर : सध्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. गल्लीबोळात शाळा, कॉन्व्हेंटचे पेव फुटले असून नागपूर जिल्ह्यात २२ शाळा अनधिकृत असल्याची बाब समोर आली असून या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले आहे.

अनधिकृत शाळांच्या वर्गवारीत सर्वाधिक शाळा या हिंगणा तालुक्यातील आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार कुठलेही व्यवस्थापन विनापरवानगी शाळा सुरू करू शकत नाही. अशा शाळा कलम १८(५)नुसार कारवाईस पात्र आहे. अशा विनापरवानगी २२ शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार केली.

या सर्व शाळांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. संबंधित अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास व्यवस्थापनास एक लाखांचा दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवस १० हजारांचा दंड ठोठाविण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ही जबाबदारी पालकांची राहील, असेही शिक्षणाधिकारी कुंभार यांनी कळविले आहे.

बालकांचे नुकसान होऊ नये

पालकांचा शिक्षणाकडे वाढता कल पाहता या शाळा सुरू केल्या. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे त्या शाळा अनधिकृत ठरल्या आहेत. यु-डायस वर या शाळांना बोगस शाळा म्हणून नोंदविण्यात आले आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे जाहीर करण्यात आले आहे.

ह्या आहेत अनधिकृत शाळा

काटोल तालुक्यातील सनशाइन इंग्लिश मेडियम स्कूल, पंचवटी, कामठी तालुक्यातील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, येरखेडा, त्रिमूर्ती पब्लिक कॉन्व्हेंट बाजारगाव, सिद्धिविनायक स्कूल बुटीबोरी, तथास्तू इंग्लिश स्कूल बेलतरोडी, न्यू प्रेरणा कॉन्व्हेंट टाकळघाट, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल, भगिरथ पार्क वानाडोंगरी, सार्थक इंग्लिश स्कूल राजीवनगर, एस.के.इंटरनॅशनल स्कूल राजीवनगर, पोलिस पब्लिक स्कूल एसआरपी कॅम्प, एसजीएम पब्लिक कॉन्व्हेंट नीलडोह देवी, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल इसासनी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट सिर्सी उमरेड, एक्सल इंटरनॅशनल स्कूल कळमना, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दाभा, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल इंदोरा, मदर्स कीड्स स्कूल बिनाकी, एलिझाबेथ कॉन्व्हेंट सेमिनरी हिल्स, दार-ए-मदिना इंग्लिश स्कूल शांतीनगर, मदरसा दारुलम तजुलवरा गर्ल्स गांधीबाग, मदरसा दारुलम तजुलवरा बॉईज गांधीबाग, न्यू रहेमानिया इंग्लिश प्रायमरी स्कूल मोमीनपुरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com