नागपूर : आयोगाद्वारे अंतिम रचनेत प्रभाग २९ सर्वात मोठा

प्रभागाची अंतिम रचना जाहीर; ४८ क्रमांकाचा प्रभाग सर्वात लहान
Nagpur Election Commission Ward 29 is largest in population
Nagpur Election Commission Ward 29 is largest in populationsakal

नागपूर : प्रभागाच्या प्रारूप आराखड्यात ५१ क्रमांकाचा प्रभाग सर्वात मोठा होता. परंतु तत्कालीन नगरसेवकाने केलेल्या सूचनेनंतर राज्य निवडणूक आयोगाने बदल केला. त्यामुळे आता दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक २९ लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. या एकाच प्रभागात निवडणूक आयोगाने केलेल्या बदलामुळे प्रभाग क्रमांक ४८ सर्वात लहान ठरला. निवडणूक आयोगाने प्रभागाची अंतिम रचना आज राजपत्रात प्रकाशित केली असून यानुसारच महापालिका निवडणूक होणार आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज ५२ प्रभागाची अंतिम रचना जाहीर केली. महापालिकेने नागरिकांसह माजी नगरसेवक, इच्छुकांसाठी ही प्रभाग रचना महापालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. नव्या १५६ प्रभागाची अंतिम रचना २०११ च्या लोकसंख्येनुसार करण्यात आला.

प्रत्येक प्रभागातील अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्याही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रभागात अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या अधिक, तो प्रभाग त्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येईल. परंतु येत्या चार ते पाच दिवसांत महिलांचे आरक्षण घोषित होईल. एका प्रभागात एक तर एका प्रभागात दोन महिला राहतील. परंतु अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गात पुरुष लढेल की महिला, हे येत्या चार-पाच दिवसांत स्पष होईल.

दरम्यान, आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभागाच्या अंतिम रचनेत प्रारूप आराखड्यातील प्रभाग क्रमांक २९ च्या सीमांमध्ये बदल करण्यात आला. त्याच्या परिणाम प्रभाग क्रमांक ४८ व प्रभाग क्रमांक ४६ वर झाला. अंतिम रचनेनंतर ४५ हजार ३७२ लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक ४८ ची लोकसंख्या आता ४१ हजार ९२ पर्यंत कमी झाली. हा प्रभाग सर्वात लहान आहे.

प्रारुप आराखड्यात ४३ हजार २१५ लोकसंख्या असलेला प्रभाग क्रमांक ४६ आता ४२ हजार २६६ लोकसंख्येचा झाला. नवीन रचनेत केवळ या तीन प्रभागांमध्ये बदल झाला. इतर ४९ प्रभागांच्या प्रारूप रचनेला निवडणूक आयोगाने अंतिम रचना म्हणून मंजुरी दिली.

काय होता आक्षेप

प्रभागाचा अंतिम आराखड्यावर निवडणूक आयोगाने सूचना, आक्षेप मागितले होते. प्रारूप आराखड्यात प्रभाग २९ ची रचना नैसर्गिक नव्हती. या प्रभागाच्या भोवताल चारही बाजूने मोठा रोड होता. परंतु प्रभाग ४८ व प्रभाग ४६ मधील काही भाग रस्त्याच्या पलिकडेपर्यंत करण्यात आला. त्यामुळे हे दोन्ही प्रभाग मोठा रस्ता छेदून प्रभाग २९ ला जोडण्यात आले. यावर तत्कालीन नगरसेवकाने आक्षेप घेत प्रभाग २९ मधून प्रभाग ४८ व प्रभाग ४६ मधील काही भाग तोडण्याची सूचना केली होती.

प्रभाग पद्धती ः त्रिसदस्यीय

  • एकूण प्रभाग ः ५२

  • एकूण सदस्य ः १५६

५० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले

एकूण प्रभाग } 10

५० हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेले

एकूण प्रभाग } 42

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com