तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी; व्हीडिओ व्हायरल

हिस्लॉप महाविद्यालय समोर जवळपास सहा ते सात तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Fights in girls
Fights in girlsSakal
Summary

हिस्लॉप महाविद्यालय समोर जवळपास सहा ते सात तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नागपूर - हिस्लॉप महाविद्यालय समोर जवळपास सहा ते सात तरुणींमध्ये (Girls) तुंबळ हाणामारी (Fighting) झाली. या घटनेचा व्हीडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. पोलिसांकडून (Police) अधिकृतपणे याला दुजोरा मिळाला नसून या संदर्भात सीताबर्डी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार (Complaint) नसल्याचे पोलिस निरीक्षक अतुल सबनिस यांनी सांगितले.

शहरात दुपारच्या सुमारास तरुणींमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकींचे केस ओढण्यापासून तर शिवीगाळ करत चांगलीच झटापट झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या हिस्लॉप कॉलेजजवळची असल्याचे बोलले जात आहे.

दुपारच्या वेळेस रस्त्याकडेला उभा असलेल्या या ६-७ तरुणींमध्ये अचानक भांडण सुरू झाले नंतर त्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. भर-रस्त्यात या ६-७ तरुणी एकमेकींचे केस ओढत मारहाण करू लागल्या. यावेळी रस्त्यावर गर्दी जमली होती. दरम्यान, कुणीतरी त्याचा व्हीडिओ शूट करून तो सोशल मीडियावर टाकला. या हाणामारीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, हा व्हीडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिस निरीक्षक सबनिस यांनी ही या घटनेच्या घटनास्थळाची ओळख सुद्धा पटत नसल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com