Nagpur : अपघातात माजी शिक्षण उपसंचालकांचा मृत्यू Nagpur Former Deputy Director of Education dies accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Nagpur : अपघातात माजी शिक्षण उपसंचालकांचा मृत्यू

नागपूर : सेवानिवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या मोपेडला मोटारसायकने धडक दिल्याने जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.८) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास जाफरनगर येथील मनशा चौकात घडली.

एच. रेहमान (वय ७३ रा. प्रशांतनगर) असे माजी अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एच. रहमान हे जाफरनगर येथे राहणाऱ्या पुतण्याच्या घराकडून घरी परत येत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या मोटारसायकल चालकाने त्यांच्या मोपेडला धडक दिली. यात, त्याच्या डोक्यासह हातापायाला गंभीर दुखापत झाली झाली.

याशिवाय युवकही जखमी झाला. त्यांना तत्काळ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज सकाळी दहा वाजता उपचारादरम्यान एच रहमान यांचा मृत्यू झाला. ते २००५-०६ या कालावधीदरम्यान विभागीय शिक्षण कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी तनवीर रेहमान आणि मुलगी डॉ. मुनझा फातिमा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.