Nagpur : गुढीपाडव्याला होणार सोने व चांदीचे दागिन्याची ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

Nagpur : गुढीपाडव्याला होणार सोने व चांदीचे दागिन्याची ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री

नागपूर : वर्षातील साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने सर्वत्र उत्साह दिसत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात अडीच हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

या दिवशी सोने व चांदीचे दागिने खरेदी करणे, वाहन, गृह खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, लग्न सराईची खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे शहरातील सराफ बाजार, वाहन बाजार, कापडबाजार फुलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापारीही जोमाने तयारीला लागले आहेत.

एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराईची धामधूम राहणार आहे. त्यामुळेही सोन्याचे दागिने खरेदीत तिप्पटीने वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुढीपाडव्याच्या खरेदीने विक्रीची नवी गुढी उभारली जाईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोनारांनी मोठ्या प्रमाणात दागिन्यांचा साठा करून ठेवला आहे. ग्राहकांकडून आतापासूनच गर्दी टाळण्यासाठी दागिन्यांची

गुढीपाडव्याला होणार ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री

पसंती करून ठेवलेली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने घरी आणण्यास आतूर आहेत. सोन्याच्या दराने साठ हजारांचा आकडा पार केला आहे. तरी ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साह कायम आहे. याशिवाय वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून ग्राहकांनी वाहनांचे व दागिन्यांचे बुकिंग करण्यावर भर दिला आहे.

बांधकाम व्यावसायिकांसाठी हा गुढीपाडवा अतिशय महत्त्वाचा सण आहे. शहरात विविध गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असून चौफेर ग्राहकांची फ्लॅटची खरेदी सुरू आहे. बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आलेले आहेत.

विजय दरगन, अध्यक्ष क्रेडाई

बांधकाम व्यावसायिकांसाठी हा गुढीपाडवा अतिशय महत्त्वाचा सण आहे. शहरात विविध गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असून चौफेर ग्राहकांची फ्लॅटची खरेदी सुरू आहे. बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आलेले आहेत.

विजय दरगन, अध्यक्ष क्रेडाई

़‘गुढीपाडव्याला चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्यांमध्ये उत्साह आहे. चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. वाहने बुकिंग केली जात आहेत. गुढीपाडव्याला चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होईल.’

-दीपलक्ष्मी खेडेकर, महाव्यवस्थापक जयका मोटर्स

सोन्याच्या दारात आज विक्रमी वाढ झाली होऊन साठ हजारांचा विक्रमी टप्पा पार केला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरात अकराशे रुपयाची वाढ झाली असून साठ हजार शंभर रुपये प्रति तोळा दर झाला.

नागपूर हे मध्यभारतातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे ग्राहकांची कायम वर्दळ असते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे. त्यात सोने, चांदी, वाहने, फ्लॅटससह इतरही साहित्यांची आणि लग्नसराईचा मुहूर्त लक्षात घेता २५०० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

- दीपेन अग्रवाल,अध्यक्ष महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार संघ (कॅमेट)