Nagpur : निकाल डोळ्यात अंजन घालणारे ; केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिपक केसरकर

Nagpur : निकाल डोळ्यात अंजन घालणारे ; केसरकर

नागपूर : काल ग्राम पंचायती निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जनतेचा कौल कोणाच्या बाजुने होता हे स्पष्ट झालं आहे. हे निकला उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहेत. आतातरी त्यांनी समजून पुढील निर्णय घ्यावेत, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

विरोधकांकडून गेल्या तीन दिवसांपासून चिथावणाऱ्या घोषणा सातत्याने दिल्या जात आहेत. अशा घोषणा आम्ही शांतपणे काम करतोय, आम्हाला कामे करू द्यावीत. अशी कितीतरी प्रकरणं आम्हाला काढता येतात आणि घोषणाबाजीही करता येते. परंतु, आम्ही शांतपणे काम करतोय, असे केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंसदर्भात बोलताना केसरकर म्हणाले, ते विधानभवन परिसरात आल्यानतर पक्ष कार्यालयात न जाता थेट काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गेले.बाळासाहेंबानी कधीही मुख्यमंत्री पदाची लालसा बाळगली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताच्या मागे धावले, हिंदूत्वाचा गजर त्यांनी केला म्हणून ते बाळासाहेबांच नाव प्रत्येकाच्या मनात कायम आहे. परंतु, इथे मुख्यमंत्रीपदासाठी सर्व काही सुरू असल्याचे दिसते. तुम्ही तुमच्या लोकांना प्रेम देऊ शकला नाहीत म्हणून ते तुमच्यापासून दुरावले ही वस्तूस्थिती न पाहता खोके म्हणून चिडवायचं, आरोप करायचे हे तुम्ही तुमच्या कृतीतू सिद्ध केलयं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

आम्ही विदर्भाच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेणार, याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत. नागपूरला ज्यावेळी अधिवेशन होतं त्यावेळी संपूर्ण विदर्भाच्या अनेक प्रश्नांना गती मिळत असते. त्यातून अनेक महत्वाचे निर्णय होत असतात. हे नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्याबरोबर विदर्भाच्या समस्येबद्दल बोला, त्यासंदर्भातील मागण्यांबाबत बोला, नुसतं बोलून काही उपयोग नाही. कुठल्याही परिस्थितीत विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र म्हमून समान न्याय संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, असे केसरकर म्हणाले.