नागपूर : लाचेत अडकले मुख्यालय सहायक, लिपिक

शेतजमिनीची मोजणी करून देण्याच्या कामासाठी पाच हजारांची मागणी
Nagpur Headquarters Assistant corruption Demand money for Measuring agricultural land
Nagpur Headquarters Assistant corruption Demand money for Measuring agricultural landsakal

भद्रावती : शेतजमिनीची मोजणी करून देण्याच्या कामासाठी पाच हजारांची मागणी करणारे भूमि अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक आणि छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

तक्रारदार हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. त्याचे भद्रावती तालुक्यातील तिरवंजा येथे शेत आहे. शेतजमिनीची मोजणी त्यांना करायची होती. त्यामुळे त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक संजय भीमराव चांभारे आणि छाननी लिपिक प्रशांत लिलाधर सोनकुसरे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली.

प्राप्त तक्रारीवरून केलेल्या पडताळणी कारवाईत चांभारे आणि सोनकुसरे यांच्याकडून पाच हजार रुपयांची मागणी स्पष्ट झाली. भूमी अभिलेख कार्यालयातच पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईदरम्यान छाननी लिपिक प्रशांत सोनुकसरे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com