नागपूर : वीज पडून दोन महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Death in lightning strikes

नागपूर : वीज पडून दोन महिला ठार

नागपूर : अंगावर वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. तसेच सात शेळ्या ठार झाल्या. दोन शाळकरी विद्यार्थी थोडक्यात बचावले. या घटना चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात घडल्या. चिमूर (जि. चंद्रपूर) : पावसादरम्यान वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मासळ शेतशिवारात शुक्रवारी दुपारी घडली. तर साडेचारच्या सुमारास तळोधी नाईक येथे वीज पडल्याची दुसरी घटना घडली. या घटनेत सुदैवाने शाळकरी मुले बचावली.

तळोधी नाईक येथे साडेचारदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाजवळील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यावेळी जिल्हा परिषद शाळेची सुट्टी झाली. तळोधीचे सरपंच मदनपाल येसांबरे यांची मुलगी प्राची व तळोधी येथील कलश गुडधे (वर्ग पहिला) हे दोघेही घराकडे जात असताना थोडक्यात बचावले. मासळ (बु.) येथील प्रियंका किशोर मोडक (वय २५) शेतातून घरी येत होती. दरम्यान, विजेच्या धक्क्याने प्रियंकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

वर्धा : वीज कोसळल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सेलू तालुक्यातील कोपरा गावात गुरुवारी दुपारी घडली. नीलिमा सुभाष निवल (वय ४७) असे मृत महिलेचे नाव आहे. कोपरा येथील सुभाष निवल यांच्या तीन एकर शेतामध्ये सोयाबीनची पेरणी सुरू होती. कोपरा येथील चंद्रशेखर निवल, अनंता निवल, नीलिमा निवल, रत्नकला लोहकरे हे शेतात पेरणीकरिता आले होते. पावसाला सुरुवात झाल्यामुळे सगळे झाडाखाली थांबले होते. पाऊस थोडा कमी होताच घरी जाण्याकरिता निघाले असताना वीज पडल्याने नीलिमा यांचा जागीच मृत्यू झाला.

लाखनी (जि. भंडारा) : घरची जनावरे चारण्यासाठी शेतशिवारात नेले असता अचानक अंगावर वीज पडल्याने दोघे जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी रेंगेपार (कोठा) येथे सायंकाळी घडली. अशोक पिंपळशेंडे व टेकराम चोपकर अशी जखमींची नावे आहेत. कुटुंबीयांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे नेले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशोक पिंपळ शेंडेला तपासून प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविले. तर टेकराम चोपकर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे सेलारी, ता. पवनी येथे वीज पडून ताराचंद बलराम मुंडले यांच्या तीन शेळ्या, संजय रमेश शेंद्रे यांच्या दोन शळ्या व सचिन रमेश शेंद्रे यांच्या दोन शेळ्या मरण पावल्या.

Web Title: Nagpur Heavy Rain Two Women Death In Lightning Strike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top