आता हॉटेलमध्ये खाणेही महागणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foods For Lunch

आता हॉटेलमध्ये खाणेही महागणार, नवं दरपत्रक छपाई सुरू

देशातील महागाईचा आलेख सतत चढाच दिसत आहे. भाज्यापासून, गहू, डाळी आणि तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. अशात पुन्हा एकदा व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात १०० व ५० रुपयांनी वाढ झाल्याने येत्या आठ दिवसात हॉटेलमधील जेवणही महागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शहरातील काही हॉटेल चालकांनी मेन्यू कार्डच्या दरात वाढ केली आहे. काहींनी दरवाढीचे मेन्यू कार्ड छपाईला टाकल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेला हॉटेल व्यवसाय आता रुळावर येऊ लागला होता. ग्राहकांची वर्दळही वाढली होती. वाढत्या महागाईमुळे हा उद्योग चालवणे जिकिरीचे बनले आहे.

सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय चालवणे आम्हाला परवडेनासे झाले आहे. पेट्रोल, डिझेल, भाज्या, नॉनव्हेज या सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. आता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर अडीच हजार रुपयाच्या जवळपास गेलेला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला इंधन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १०४ रुपयांची वाढ केली होती. त्यापाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सामान्यांही धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता हॉटेलमधील जेवणही महागणार असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरातील काही असोसिएशनने दर वाढीचा निर्णय घेतला आहे. या वाढत्या महागाईत काळात सध्याच्या रेटमध्ये जेवण पुरवणे शक्य होणार नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे.

महागाई दररोज वाढते आहे. व्यावसायिक गॅसही महागला आहे. याशिवाय मसाले, तिखट, खाद्य तेलाच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. त्यामुळे सावजी हॉटेलमधील खाद्यपदार्थ येत्या आठ ते दहा दिवसात महागणार आहेत.

- जगदीश खापेकर, अध्यक्ष, सावजी असोसिएशन.

डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने भाजीपाला आणि किराण्याच्या भावात वाढ झाली. आता एलपीजी सिलिंडरची किंमतही वाढविल्याने उत्पादन खर्चात एकाएकी वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

- मनदिपसिंग पद्‍म, नागपूर इटरी ओनर्स असोसिएशन

Web Title: Nagpur Inflation Cylinder Price Rate Increase Hotel Expensive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top