नागपूर : खाद्यतेल स्वस्त होणार

पाऊस लांबल्याने तुरीची डाळ महागणार
Edible Oil Price Updates
Edible Oil Price Updatessakal

नागपूर : केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात सुरु केल्याने गेल्या महिन्याभरात घट झालेली आहे. सूर्यफूल, सोयाबीनचे तेल लिटरमागे २० ते २५ रुपयांनी स्वस्त झालेले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले असताना ग्राहकांचा दिलासा मिळाला आहे.

किरकोळ बाजारात खाद्य तेलाचा भाव १५० ते १७० रुपये प्रती लिटर या दरम्यान आले आहे. मागील सहा महिन्यापासून खाद्य तेलाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. त्याला अनेक कारणे होती. रशिया-युक्रेन युद्ध, मलेशियाकडून पाम तेल निर्यातीवर निर्बंध यासारख्या कारणांमुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र मागील आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव कमी झाले. त्याशिवाय भारताला अर्जेंटिना आणि रशियाकडून खाद्य तेलाचा पुरवठा वाढला आहे. या दोन्ही देशांमधून सूर्यफूल तेलाचा जादा पुरवठा होत आहे. ज्यामुळे तेलाचे भाव कमी झाले आहेत. ही घट दिलासा देणारी असली तरी ग्राहकांच्या खिसा हलका करणारीच आहे.

पेरणीचा काळ वाढला, बाजारात चिंता

पावसाने दडी मारल्याने डाळीचे पीक उशिराने बाजारात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खरीप पिकांच्या पेरणीचा काळ वाढल्‍याने बाजारात चिंता वाढली आहे. परिणामी, तूर डाळीच्या दरात प्रति किलो गेल्या आठवड्याच्या तुलनेत चार रुपयांनी महागली आहे. त्यात अजून वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शाळा सुरु झाल्याने किराणा बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. परिणामी, बाजारात शांतता आहे. परिणामी बाजारातील ग्राहकांची संख्याही कमी झालेली आहे असे देशमुख म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com