नागपूर : खरीप पिकांची पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील भाज्यांचे उत्पादन घेणे बंद केल्याने स्थानिकांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे. बाहेरून भाज्यांची आवक सुरु झाल्याने इंधन दरवाढीमुळे भाज्यांचे भाव कडाडले आहे. पालक, दुधी भोपळा, कोहळ, वांगे आणि पत्ताकोबीचे भाव सामान्यांच्या आवाक्यात आहेत. कोथिंबीर, टोमॅटो आणि मेथी, शिमला मिरचीसह सर्वच भाज्यांचे भाव वाढलेले आहेत.
भाज्यांचे भाव वाढले
पेट्रोल, डिझेल महागल्याचे परिणाम आता सर्वच जिन्नसावर दिसू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अतिशय अल्प प्रमाणात भाज्या येत असून शनिवारी बाजारात ६० ते ७० गाड्यांची आवक झाली. ती मागणीच्या तुलनेत ५० टक्के कमी आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह इतर शहरांतून भाज्यांची आवक सुरु आहे. कोथिंबीर दिल्ली येथून येत आहे. तर टोमॅटोची आवक महात्मा फुले भाजी बाजार आणि कळमना बाजारात जयपूर, बरेली आणि छिंदवाड्यातून सुरू आहे.
भाजीपाला ठोक भाव (रुपये/प्रतिकिलो)
वांगे -२५
फुलकोबी -२५
पानकोबी -१५
टोमॅटो -७०
मेथी -६०
कोथिंबीर -६०
शिमला मिरची - ६०
हिरवी मिरची - ४०
पालक - १०
भेंडी - ४०
तोंडले - ४०
कोहळे -१५
दुधी भोपळा -२०
मुळा - ६०
काकडी - २५
ढेमस - ५०
कारले - ५०
बारीक घोळ ः ४०
दोडके - ६०
आंबे - ४०
चवळी शेंगा -६०
फणस - ४०
गवार शेंग ६०
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.