Nagpur : IT यंत्रणांना सुरक्षित ठेवणारे ‘सायबर एरा’ Nagpur IT systems Cyber Era protect | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IT systems

Nagpur : IT यंत्रणांना सुरक्षित ठेवणारे ‘सायबर एरा’

नागपूर : तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतर माहिती, धन संपत्ती अशा प्रत्येक खाजगी बाबीसाठी आपण तंत्रज्ञानापुढे अक्षरशः लोटांगण घातले आहे. आपल्या संपत्तीवर चोरट्यांचा डोळा पडला नाही तर नवलच.

हायटेक तंत्राचा वापर करीत बसल्या जागेवरून हे चारटे बँक, शासकीय कार्यालये, कंपन्यांच्या सर्व्हर, वेबसाइट हॅक करीत पैशावर डल्ला मारतात. यावर उपाय म्हणून आदर्श कांत या अभियंत्याने ‘सायबर एरा’सेवेची निर्मिती केली आहे. त्यांच्या दिमतीला बाराशे हॅकर्सही आहेत.

www.cyber3ra.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून सेवा घेणाऱ्या संस्था हॅकर्स (तंत्रज्ञ)ची या कामासाठी नेमणूक करू शकतात. ‘सायबर एरा’तर्फे संपूर्ण देशातील संस्थांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून बाराशेपेक्षा जास्त हॅकर्स या संस्थेच्या दिमतीला उपलब्ध आहेत. हे हॅकर्स अशा संस्थांचे कॉप्युटर सर्व्हर, कोडिंग, वेबसाइट, ॲन्ड्रॉइड ॲप्लीकेशन्स, ब्लॉक चेन (बीट कॉइन टेक्नोलॉजी) आदी अत्यत संवेदनशील यंत्रणा हॅक करायचा प्रयत्न करतात.

हॅक करताना तंत्रज्ञानामध्ये चोरट्यांसाठी उपयुक्त ठरणारे कच्चे दुवे, तंत्रज्ञानान निर्मितीतीमधील कमतरतेचा शोध घेतात. यंत्रणा हॅक होत असल्यास अशा कमकुवत गोष्टींबाबत संस्थेला सजग केले जाते. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा अधिक सजग कशी करता येईल, याबाबत ‘सायबर एरा’तर्फे टिप्स दिल्या जातात.

आदर्शने महाविद्यालयीन काळात काही बँकांसोबत सायबर सिक्युरिटीवर काम केले. या दरम्यान शासकीय संस्था अन्‌ खाजगी कंपन्यांची याबाबतची गरज त्याने ओळखली. त्यानंतर, २०२१ साली सायबर एरा या स्टार्टअपची सुरुवात केली.

आदर्श कांत हा युवक या स्टार्टअपचा संस्थापक असून लक्ष्मीधर गावपांडे सहसंस्थापक आहे. तर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) शौकीन चौहान आणि कंपनी संचालकांचे यात मार्गदर्शन लाभत आहे. हॅकर्सचा हा समुह आज ‘एथिकल हॅकर्स आर्मी’ म्हणून ओळखला जातो.

संस्थेचे वैशिष्ट्ये

  • तंत्रज्ञानातील सर्वात प्रगत कार्य

  • तंत्रज्ञानातील कमतरता एका क्लिकवर दूर

  • निकाल देणारे प्रगत व्यवस्थापन

  • कामाचे प्रगत विश्‍लेषण

  • २० पेक्षा जास्त सायबर हल्ल्यावर परिणामकारक