नागपूर : कारवाईतून झाली डीबी पथकाचीच शिकार?

जुने कामठी पोलिस ठाण्यातील घटना; फोनवरून कर्मचाऱ्याचीच हकालपट्टी
nagpur kamthi police db squad action illegal sand transportation
nagpur kamthi police db squad action illegal sand transportationsakal

कामठी : गृहविभागाच्या पोलिस खात्यात शहर असो की ग्रामीण प्रत्येक पोलिस ठाण्याला असामाजिक तत्वावर नियंत्रयाकरिता डीबी पथक तयार केले जाते. संबंधित ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाच्या आवडीच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा यात समावेश असतो. येथील दोन ठाण्यांपैकी एक असलेले जुने कामठी पोलिस ठाण्यात डीबी पथकावर आगळी-वेगळी घटना घडल्याने एका डीबी पथकाला पायउतार व्हावे लागले.

पोलिस खात्याची बाब जिथे आली, तिथे आर्थिक व्यवहार न येईल असे होऊच शकत नाही, अशी सर्वसाधारण जनतेची समज आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केल्यानंतर पोलिसांना कार्यवाही न करण्यासाठी राजकीय व दलालाचे फोन येणे ही बाब नवीन नाही. परंतु पोलिस निरीक्षकांना त्यांच्या वरिष्ठ स्तरावरून वाहन सोडण्यासाठी फोन करणे व वाळूचे वाहन न सोडल्यास डीबी पथकातील कर्मचाऱ्याला डीबीतून पायउतार करणे, अशी घटना जुने कामठी पोलिस ठाण्यात मागील महिन्यात घडली. पोलिस खात्याने याची गुप्तता बाळगली असली तरी शहरात मात्र चर्चेचा विषय झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुने पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खैरी शिवारात अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनाला डीबी पथकात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडले व कारवाई करून हे वाहन नवीन कामठी पोलिस ठाण्यात जमा केले. या वाहनाला सोडण्याकरिता वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त कार्यलयाकडून पकडलेल्या वाहनाला सोडण्याकरिता फोन आला. त्या वाहनाला न सोडल्याने त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठांच्या तोंडी आदेशवरून डीबी पथकातून काढण्यात आले व नवीन डीबी पथक तयार करण्यात आले. डीबी पथक हे पोलिस निरीक्षकांना अवैध धंद्याकडून प्राप्त होणारा निधी आणून देते, हे सर्वश्रुत आहे.

पण पोलिस विभागाच्या ते सुद्धा वरिष्ठ कार्यल्याकडून अवैध धंदे किंवा वाळू परिवहन करणाऱ्या वाहनाला सोडण्याकरिता फोन करणे व न सोडल्यास कार्यवाही होणे अपेक्षित तरी आहे काय, अशी चर्चा नागरिकांत आहे. पोलिस कर्मचारी जनतेत आपली वचक निर्माण करीत असला तरी अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास होणे काही नवीन बाब आहे. मात्र वाळूचे वाहन न सोडल्याने डीबी पथकातील कर्मचाऱ्याला डीबीतून पायउतार करण्यात आल्याची अशी घटना जुने कामठी पोलिस स्टेशनला घडल्याने शहरात मात्र चर्चेचा विषय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com