एका तासात मारले तब्बल ३३३१ पुशअप्स! नागपूरच्या कार्तिकचा विश्वविक्रम

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या विक्रमी कामगिरीची नोंद लवकरच गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होणार
Nagpur Karthik s world record 3331 pushups in one hour Guinness World Records
Nagpur Karthik s world record 3331 pushups in one hour Guinness World Recordssakal

नागपूर : उपराजधानीतील २१ वर्षीय कार्तिक जायस्वालने अवघ्या एका तासात तब्बल ३३३१ पुशअप्स मारून नवा विश्वविक्रमाची नोंद केली आहे. नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या विक्रमी कामगिरीची नोंद लवकरच गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होणार आहे. सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात बुधवारी आयोजित या विश्वविक्रमी उपक्रमात कार्तिकने आपल्या फिटनेसचा परिचय देत तासाभरात तीन हजारांच्या वर पुशअप्स मारून नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. कार्तिकची विश्वविक्रमी कामगिरी जवळून पाहण्यासाठी सभागृहात मोठी गर्दी जमली होती. यापूर्वीचा जागतिक किर्तीमान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर होता, जो आता इतिहासजमा होणार आहे. डॅनियलने तो विश्वविक्रम याच वर्षी नोंदविला होता. उल्लेखनीय म्हणजे, कार्तिकने याआधीसुद्धा एका मिनिटात सर्वाधिक टाईल्स फोडण्याचा विक्रम केलेला आहे.

एमएमए फायटर भारत आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असलेला कार्तिक या विक्रमासाठी गेल्या पाच वर्षांपासून कसून तयारी करीत होता. तो दररोज सहा तासांपेक्षा अधिक वेळ सराव करायचा, शिवाय दोन वर्षांपासून जिममध्ये विशेष प्रशिक्षण घेत होता. त्याचवेळी एक तास ध्यानही करायचा. डॅनियलने त्याचा विक्रम कुणीही मोडू शकणार नाही, असे आव्हान दिले होते. कार्तिकने हे अवघड आव्हान स्वीकारत तयारी सुरू केली होती. डॅनियलचा विक्रम मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा कार्तिकने काही महिन्यांपूर्वी केली होती. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कार्तिकने हे असाध्य साध्य करून दाखविले. या विश्वविक्रमी कामगिरीबद्दल कार्तिकने आनंद व्यक्त केला आहे.

डॅनियल स्कालीचा विश्वविक्रम मोडीत काढण्याचा निर्धार करून मी तयारीला लागलो होतो. हे माझ्यासमोर फार मोठे आव्हान होते. पण माझी पुरेशी तयारी होती. त्यामुळेच मी हे अवघड आव्हान स्वीकारले. विश्वविक्रम केल्याचा मला मनापासून आनंद आहे.

- कार्तिक जायस्वाल, विक्रमवीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com