एकच शेतजमीन दोघांना विकली, लाखोंची फसवणूक

खदान पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल
Nagpur land scam Selling same farmland to both
Nagpur land scam Selling same farmland to bothsakal

अकोला : जिल्ह्यातील कुरणखेड दाबकी शेतशिवारातील एकच जमीन दोन जणांना परस्पर संमतीने विकून तीन लाख पन्नास हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशन येथे आरोपी राजेश वामनराव गिरी, कृष्णागर धनराज तायडे दोघेही रा. व्हिएचबी कॉलनी मलकापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

फिर्यादी गजानन केशव छबिले (रा. व्हिएचबी कॉलनी मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये शेती घ्यायची असल्याने त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी राजेश वामनराव गिरी रा. व्हिएचबी कॉलनी मलकापूर यांने आरोपी कृष्णागर धनराज तायडे याची कुरणखेड दाबकीजवळ शेती असल्याचे सांगितले. शेतीचा सातबारा कृष्णागर तायडे याच्या नाव असल्याचे दाखवून एक लाख ७५ हजार एक्करप्रमाणे दोन एक्करचे तीन लाख ५० हजार दिल्यानंतर शेतीचे खरेदीखत नोंदविण्यात आले.

यादरम्यान फेब्रुवारी २०२१ मध्ये एका इसमाने सदर शेत जमीन ही माझ्या नावे असल्याचे सांगितल्याने तपासणी केली असता कृष्णागर तायडे, राजेश जोशी या दोघांनी ही शेती रेखा हेमंत मोहोड यांना विकल्याने समजले. सदर शेत जमीन पूर्वीच विकली असल्याने आरोपी राजेश वामनराव गिरी, कृष्णागर धनराज तायडे दोघेही रा. व्हिएचबी कॉलनी मलकापूर यांनी संगनमताने तीन लाख ५० रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरोधात भादंवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com