Marriage : पुन्हा वाजू लागले सनई चौघडे; मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल्सचे बुकिंगही फुल्ल

गुरूचा अस्त झाला असून बाशिंग बांधून ‘आली लग्न घडी समीप... शुभमंगल सावधान’ ही मंगलाष्टके ऐकू येऊ लागली आहेत. लग्नाची धामधूम सुरू झालेली आहे.
Marriage
Marriageesakal
Summary

गुरूचा अस्त झाला असून बाशिंग बांधून ‘आली लग्न घडी समीप... शुभमंगल सावधान’ ही मंगलाष्टके ऐकू येऊ लागली आहेत. लग्नाची धामधूम सुरू झालेली आहे.

नागपूर - गेला दीड महिना गुरूचा अस्त असल्याने विवाह किंवा कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करता येत नसल्याचे ज्योतिष अभ्यासक सांगत होते. पण आता तो काळ संपला असून विवाहोत्सुकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

गुरूचा अस्त झाला असून बाशिंग बांधून ‘आली लग्न घडी समीप... शुभमंगल सावधान’ ही मंगलाष्टके ऐकू येऊ लागली आहेत. लग्नाची धामधूम सुरू झालेली आहे. लग्नतिथीला हजारो लग्नाचे बार एकाच दिवशी उडत आहेत. लग्न कार्यालय, लॉन, हॉटेल्सचा परिसर बॅण्डने दुमदूमू लागला आहे.

दीड महिन्यानंतरचा मुहूर्त

गुरू जेव्हा सूर्याजवळ ११ अंशांवर येतो, तेव्हा त्याला गुरूचा अस्त म्हणतात. ज्योतिष्यशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पती हा धर्म आणि शुभकार्याचा कारक आहे. या कारणास्तव गुरू अस्त झाल्यावर शुभकार्य होत नाहीत. यामुळे मागील दीड महिन्यात लग्नाचे मुहूर्त नव्हते.

मे व जून महिना मिळून लग्नाच्या २५ तिथी आहेत. यासाठी जानेवारीपासूनच बुकिंग करण्यात आली आहे. बहुतांश कार्यालयांत बुकिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय अधिक मास व चातुर्मास काळात यंदा पंचांगकर्त्यांनी गौण व आपत्कालीन लग्नतिथी दिली आहे. या तिथींवरही लग्न करण्यासाठी बुकिंग सुरू आहे.

- विजय तलमले, अध्यक्ष, नागपूर मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन

मे महिन्यात १४ लग्नतिथी -

मे २०२३ - ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०

जून महिन्यात ११ लग्नतिथी -

जून २०२३ - १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २६, २७, २८.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com