नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे गोत्यात? या प्रकरणात दाखल होऊ शकतो गुन्हा 

tukaram mundhe
tukaram mundhe

नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे शिस्तबद्ध आहेत. त्यांचा कामाचा धडाका चांगला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आहे. मात्र, प्रत्येक वेळी ते नियमांवर बोट ठेवून काम करतात. त्यांनी नियम सर्व बाबतीत लागू करायला हवे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आम्हीदेखील त्यांना यापुढे नियमांनीच उत्तर देऊ, असे महापौर संदीप जोशी म्हणाले. 

मनपा आयुक्तांनी 15 फेब्रुवारी 2020 च्या आधी अर्थसंकल्प स्थायी समितीला देणे अपेक्षित होते. पण त्यांनी तो दिला नाही. नियमानुसार ही गंभीर चूक आहे. यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आयुक्तांनी स्थायी समितीचे मार्गदर्शन मागितले आहे. यासंदर्भात 12 मार्चला विशेष सभागृह आयोजित केले आहे. मी सुद्धा यासंदर्भात सभागृहालाच मार्गदर्शन मागणार आहे. आयुक्तांनी केलेली आर्थिक कोंडी ही नगरसेवकांची नसून जनतेची कोंडी आहे. आम्हाला त्यांची कोंडी करण्यात रस नाही, आम्हाला शहरात कामे करायची आहेत. 

विकासकामाच्या कार्यादेशावर आयुक्तांच्या दोन स्वाक्षऱ्या असतात. यापूर्वीच्या आयुक्तांनी असे कार्यादेश काढलेले आहेत. त्यानंतर नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांत भूमपिूजन केले. ही कामेही मुंढेंनी थांबविली. 

तुकाराम मुंढे शिस्तबद्ध आहेत, त्यांच्या कामांचा धडाका चांगला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आहे. मात्र, सरकारने त्यांना आणि जनतेने मला येथे कामे करण्यासाठी बसविले आहे. त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत जनतेची शहरातील विकासकामे थांबू नये, असे आमचे म्हणणे असल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले. जो अधिकारी खाते लिहिणार, तोच अधिकारी लेखापरीक्षण करू शकत नाही, हा सुद्धा नियम आहे. पण महापालिकेत सध्या हाच प्रकार होत आहे. नियम 72, 73 नुसार लेखा वित्त अधिकारी पालिकेत येऊच शकत नाही. पण असे घडतेय. ही कुठली पद्धत आहे?, असा सवालही महापौरांनी उपस्थित केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com